Health Tips  esakal
कोकण

Health Tips : बालपणातील मंत्रचळ आजार

सकाळ डिजिटल टीम

मंत्रचळ ही एक मानसिक व्याधी आहे, ज्यात मनात एकाच प्रकारचे विचार, दृश्य, प्रेरणा घोळतात व ते टाळणे अशक्य होतात.


-श्रुतिका कोतकुंडे

मंत्रचळ हा अनावश्यक काळजीचा आजार आहे. तो बालवयातसुद्धा सुरू होऊ शकतो. बालवयात हा आजार ओळखणे कठीण जाते कारण, त्याची लक्षणे ही मुलांच्या सर्वसाधारण मानसिक विकासाच्या टप्प्यासारखीच भासू शकतात. मंत्रचळ ही एक मानसिक व्याधी आहे ज्यात मनात एकाच प्रकारचे विचार, दृश्य, प्रेरणा घोळतात व ते टाळणे अशक्य होतात तसेच आलेल्या विचारांशी निगडित शंकेमुळे एकच कृती पुन्हा पुन्हा केली जाते. एखाद्या चाळ्यासारख्या येणाऱ्या विचारांमुळे मुलाला प्रचंड भीती, काळजी, धास्ती वाटते. यामुळे मुलं हतबल होऊन विचारांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही क्रिया पुन्हा पुन्हा करू लागतात.

मुलांमधील लक्षणे :

- मुलांमध्ये पुन्हा पुन्हा येणारे नकारात्मक विचार, क्रिया किंवा बऱ्याचदा दोन्हीही असतात.
- जी ठराविक लक्षणे एखाद्या मुलात आढळतात त्याच विषयाभोवती विचार व क्रिया होत असतात

साधारणतः आढळणारे ठराविक विषय

स्वच्छता ः यामध्ये विटाळाचे विचार, सोवळ्याचा विचार, जंतूसंसर्गचे, घाणीचे विचार असतात व त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी मुलं सारखी हात-पाय धूत राहतात.
प्रमाणबद्धता ः यामध्ये व्यवस्थित, एकसारखं दिसण्यावर भर असतो व मुलं सर्व गोष्टी शिस्तीने लावण्यात खूप वेळ घालवतात. या गोष्टी ठराविक ठिकाणी ठेवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. कधी कधी सम-विषम असे आकडे ते मोजण्याचा प्रयत्न करतात .
धोका वाटणे ः स्वतःला किंवा पालकांना धोका असल्याचे, इजा होण्याचे विचार व ते घालवण्यासाठी देवाचे नाव जपणे, शुभ संकेत शोधणे अशा क्रिया असतात.
निषिद्ध गोष्टी ः यामध्ये स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करण्याचे विचार, लैंगिकतेचे किंवा देवाबद्दल निंदात्मक विचार असतात व त्या निगडित प्रायश्चितपर क्रिया केल्या जातात.

- सर्वसाधारणपणे मुलांमध्ये धोका वाटण्याचे विचार प्रौढांपेक्षा जास्त आढळतात. मंत्रचळाचा जो विषय असतो त्या हिशोबाने क्रिया खालील प्रमाणे केली जाते.
* पुन्हा पुन्हा तपासून बघणे व अतिशिस्तीने वागणे
* एखादी गोष्ट पुन्हा तशीच काटेकोरपणे करणे व ती तशीच झाली की नाही याबद्दल शंका घेणे
* शंका टाळण्यासाठी कर्मकांड करत राहणे ज्याने खूप वेळ खर्ची पडणे.
* अशुभ टाळण्यासाठी आपला भाग्यशाली शब्द किंवा नंबर पुन्हा मनातल्या मनात उच्चारणे.
* वाईट टळावे यासाठी सतत स्वतःला दिलासा देणे व कुटुंबीयांकडून दिलासा मागणे
* आजूबाजूच्या वस्तू एकाच पद्धतीने लावण्याची किंवा असण्याची मागणी असणे. त्या तशा नसल्यास खूप अस्वस्थ होणे.
* अशुभ टाळण्यासाठी प्रार्थना करणे, जप करणे, मनात आठवून बघणे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणे.
* एखादी वस्तू, जागा, हात-पाय सतत धूत राहणे, स्वच्छ करणे
* एखादी गोष्ट गरज नसताना जमवत राहणे.

मुलांमध्ये वागण्यातील बदल हा सर्वसाधारण दिनक्रम/शिस्त जोपासणे वाटू शकते व आजाराकडे वाटचाल कधी कधी लक्षात येत नाही


- आजाराची कारणे :
* मेंदूमधील रचनात्मक बदल
* बालपणीमनावर आघात झाल्याने मुलांची बनलेली हळवी मानसिकता.
* वैचारिक हतबलता-संकुचित वातावरण, नकारात्मक वातावरण
* अबोल एककल्ली काटेकोर मानसिकता
* जनुकीय–आई-वडिलांमध्ये मंत्रचळ असल्यास
* आई-वडिलांमधील वाद, ताणतणाव
* आई गर्भार असताना झालेल्या जंतूसंसर्गाने

- निदान :
निदानासाठी मुलाची संपूर्ण माहिती शाळेकडून व पालकांकडून घेतली जाते. कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेतली जाते. कुटुंबात व शाळेतील ताणतणावांचा आढावा घेतला जातो. प्रसंगी मुलांच्या भावनिक चाचण्या घेतल्या जातात. निदान पक्के झाले की, उपाय सुचवले जातात.
- उपाय :
* मंत्राचळासाठी प्रमुखता वैचारिक व वागणुकीतील बदल - संज्ञानात्मक वर्तन थेरपीचा खूप चांगला उपयोग होतो.
पालकांशी व शिक्षकांशी बोलून वातावरण कसे निवळेल हे बघितले जाते. ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सौम्य आधाराच्या वातावरणात सामोरे जायला व ठराविक प्रतिक्रिया टाळायला मदत केली जाते. वातावरणातील बदल, पालकांचे समुपदेशन व छोट्या छोट्या युक्त्यांनी मुलांची भीती कमी केली जाते. आधारामुळे व मार्गदर्शनाने मुलांना बोध होतो की, आपली भीती आवाजवी आहे. मन शांत ठेवल्याने नकारात्मक भावना आपल्या आपण थोड्या वेळाने कमी होतात व ठराविक प्रतिक्रिया न देताही त्या भावना ओसरतात.

* औषधे :
मंत्र चळवळ हा काळजीचा आजार असल्यामुळे प्रसंगी नैराश्य व चिंता कमी करणारे औषधांचा वापर केला जातो. याच बरोबरीने कौटुंबिक समुपदेशन, आधार गट, खेळातून शरीर शिथिलीकरण, ताणतणाव व्यवस्थापन शिकवले जाते.

* बाल मंत्रचळ कसा टाळाल
- मातेचे मानसिक व शारीरिक आरोग्य जोपासणे गरजेचे
- मुलांना एका खुल्या सुरक्षित व प्रेमळ वातावरणात वाढवणे
- कौटुंबिक वाद मुलांसमोर येणार नाहीत याची पालकांनी काळजी घ्यावी.
- घरात मोकळा संवाद व मुलांना विविध अनुभव घेण्याची मूभा असावी. शिस्तीचा अतिबडगा नसावा.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT