कोकण

पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करा

CD

पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करा

रोटरी क्लबतर्फे जनजागृती मोहीम; प्रदुषण टाळण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः गणेशमुर्ती पूर्वी शाडूच्या मातीने बनवण्याची पारंपरिक पद्धत होती; मात्र अलिकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक मूर्ती वजनाला तुलनेने कमी असल्यामुळे ती घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे; परंतु विसर्जन केल्यावर या मूर्ती सहज व लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे. सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सण साजरा करण्याचे काळानुरूप बदलेले स्वरूप याबाबत चिंतन करण्याची वेळ आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे. गणपती अर्थात श्रींच्या मूर्तीची निवड करण्याची आतापासून सुरवात झाली आहे. त्यासाठी क्लबचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, सचिव ॲड. मनिष नलावडे यांनी परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. अलिकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक मूर्ती वजनाला तुलनेने कमी असल्यामुळे ती घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे; परंतु मूर्ती विसर्जन केल्यानंतर लवकर विरघळत नाही. वजनाने हलकी असल्यामुळे पाण्याबरोबर वाहत जातात. पुढे अर्धवट विरघळलेल्या मूर्तीचे अवशेष पालापाचोळ्यात, कचऱ्यात, चिखलात पहायला मिळतात. हे थांबवण्यासाठी शाडू मूर्ती किंवा कागदाच्या लगद्यापासून लहान आकाराच्या पर्यावरणपूरक मूर्तीच घ्या, असे आवाहन रोटरीतर्फे केले आहे.
----
इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करू

गणेशोत्सवात सजावटीला थर्माकोल, प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. ध्वनी प्रदूषण टाळून शांततापूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केल्यास पर्यावरण हानी टाळता येईल तसेच खऱ्या अर्थाने मनःशांती लाभेल व गणेशोत्सव एकप्रकारे आनंदोत्सव होईल. त्यासाठी यंदाचा उत्सव इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT