Jaisalmer Rajasthan esakal
कोकण

Jaisalmer Rajasthan : सोनवाळू 'सॅण्ड ड्यून्स' नगरी जैसलमेर

हे उंटाचे मालक सर्व मुस्लिम समाजातील आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या भागात सावन नावाचे गवत उगवते तसेच वेडी बाभूळ आणि साधी बाभूळ असते. उंट त्याचे शेंडे खात असतात तसेच इथे एक गवारसारखी पण महागडी भाजी उगवते.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

जीवभूगर्भ शास्त्रज्ञाचे असे मत आहे की, राजस्थानचा मारवाड हा प्रांत लाखो वर्षांपूर्वी समुद्राचा एक भाग होता. एखाद्या भूकंपातही प्लेट वर उचलली गेली असावी कारण, अजूनही तेथे जीवाष्म सापडतात. मुळात समुद्रातील ही वाळू हजारो वर्ष वाऱ्याने घासून घासून अशी गुळगुळीत आणि बारीक केली आहे की, तुम्ही बादलीत पाणी घ्यायच्याऐवजी ही वाळू घेतलीत आणि अंघोळ केलीत तरीसुद्धा अंगाला एकही कण न चिकटता मस्त अंघोळ होईल. जैसलमेरच्या या भागातील वाळवंटाला सामचे वाळवंट म्हणतात. पाकिस्तान बॉर्डर ६० किमीवर ही वाळू सतत आपली जागा बदलते. नवीन ठिकाणी जमते तिथे बाकीची वाळू येते. तू कशी आलीस येथे मला सोडून? असे करत करत त्या ठिकाणी म्हणता म्हणता टेकडी बनते. त्यामुळे येथील टेकड्या सरकारी नोकरांप्रमाणे सतत बदल्या करून घेत असतात. अशा या टेकड्यांनाच ''स्यान्ड ड्यून्स'' असे म्हणतात .

आपल्या कोकणातील समुद्राची वाळू अंगाला चिकटली की, अगदी पार पुण्यापर्यंत पोहचेपर्यंत अंगावर कुठे कुठे कपड्यात, जीनच्या दुमडलेल्या खालच्या पायपट्टीत अडकून राहते आणि जणूकाही मला पण पुणे दाखव. लै ऐकलंय! असे सांगते; पण इथली वाळू गंमत म्हणून अंगावर टाकली आणि ढीग केला आणि दोन मिनिटात झटकून पहिली तर एकही कण नव्हता.
‘ सैम स्यान्ड ड्यून्स’ हे तंबू हॉटेल निवडले होते तेथे पोहचलो. ही हॉटेल ७/८ महिने चालतात. साधी फरशी टाकून १५ बाय १५ची जमीन करतात आणि वर कापडी तंबू असतो. सर्व व्यवस्था आतमध्ये. मार्चनंतर इथे हे तंबू काढले जातात फक्त फरशीचा चौथरा असतो.
दिवसा हे तंबू तापतात; पण आत जरा टेम्परेचर कमी असते. संध्याकाळनंतर मात्र लय भारी. उंटकी सवारीसाठी निघालो. हे सैम स्यान्ड ड्यून्स हॉटेल, जिथे वाळवंट सुरू होते तेथे मोक्यावर आहे. तंबूच्या बाहेर पाय टाकले की, वाळवंट. १५०० रुपये २४ तासाचे घेतात. बाहेर आल्यावर उंट आमचीच वाट बघत, तंबाखू खात असल्यासारखे तोंड हलवत बसले होते. प्रत्येक उंटावर दोघेजणांनी बसायचे. च्यायला; पण मला वजन बघून कोणी उंटांचा मालक पाठीवर घ्यायला तयार नाही आणि उंट पण मला बघून आपले ढुंगण अजून वाकडे करून बसले.

हे उंटाचे मालक सर्व मुस्लिम समाजातील आहेत. मुळात जैसलमेरचा हा भाग फाळणीच्या वेळी मूळचा पाकिस्तानातील ६५ च्या युद्द्यात आपण पाकिस्तानचा ११४० वर्ग किलोमीटर प्रदेश आपल्यात घेतला. त्यांनी पण ५४० वर्ग किलोमीटर आपला घेतला. त्यामुळे इथले सगळे राहणीमान पाकिस्तानी वाटले तसेच कपडे, नाकाची ठेवणं; पण अतिशय कष्टाळू आणि काटक लोक ही लोकं चालुगिरी करतात. थोडे वाळवंटात पुढे नेतात आणि नंतर ‘ साब आगे जानेका है तो, जादा पैसा लगेगा। आगे पाकिस्तान बॉर्डर, बजरंगी भाईजान, बॉर्डर का शूटिंग पॉईंटभी है। जानवरभी दिखेंगे।,’ असे म्हणत भरपूर पैसे मागतात. पुढे ते पाकिस्तानी मैलाचा दगड, शुटिंगचे स्पॉट दाखवतात. तुमचे नशीब जोरावर असेल तर हरणेपण दिसतात.

या भागात सावन नावाचे गवत उगवते तसेच वेडी बाभूळ आणि साधी बाभूळ असते. उंट त्याचे शेंडे खात असतात तसेच इथे एक गवारसारखी पण महागडी भाजी उगवते. ती तुमच्या जेवणात हमखास असते. हे उंट साधारण ३५ वर्ष जगतात. २२/२३ वर्ष काम करतात नंतर वृद्ध होतात. मग हे मालक वाळवंटात सोडून देतात. जगेल तेवढा जगेल, असे बरेच वृद्ध उंट दिसले. वाईट पण वाटले. वाळवंटात बुडता सूर्य बघण्यासारखा, संपूर्ण आकाश भगवे झाल्यासारखे.. वाळूपण हळू हळू थंड होते असते. वारा अलगद कानाजवळून जायला लागतो. करतो तुला थोडे थंड असे म्हणत अंगावरील वाळू हळूच पुन्हा आपल्याला सोडून नवीन टेकडीच्या शोधात घरंगळून पडते. आम्ही मस्त काळोख होईपर्यंत सामच्या कोरड्या समुद्रात पडलेलो असतो.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT