कोकण

कृत्रिम फुले, तोरणमाळांनी बाजारपेठा सजल्या

CD

- rat२९p२८.jpg
२४N०७८५८
- चिपळूण ः सजावटीच्या साहित्याने चिपळूणची बाजारपेठ सजली आहे. (मुझफ्फर खान ः सकाळ छायाचित्रसेवा)

गणेशोत्सवासाठी कृत्रिम फुले, तोरणमाळांनी बाजारपेठा सजल्या

चिपळूमध्ये खरेदीची लगबग ; ५०० पासून १५०० रुपयांपर्यंतच्या वस्तू

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. यंदाही घरगुती सजावटीला लागणाऱ्या तयार कमानी, कृत्रिम फुले, तोरणमाळा, स्टोन अलंकारांना मागणी वाढलेली आहे. भोगाळेसह शहरात विविध ठिकाणी विक्रेत्यांनी असे साहित्य ठेवले आहे. ५०० पासून १५०० रुपयांपर्यंतच्या वस्तूंची विक्री होते.
यंदा ७ सप्टेंबरला गणेश आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र आहे. सजावटीच्या साहित्यात लोखंडी फ्रेम, रंगीबेरंगी लाइटसह विविध सजावट साहित्याचा वापर करून तयार केलेली कमान मिळते. कमानींच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक ओढा आहे. बाजारात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. मार्कंडी, भोगाळे, चिंचनाका, गांधीचौक, जुने बसस्थानक परिसर आदी ठिकाणी साहित्य उपलब्ध झाले आहे.
बाजारात गोल मण्यांची माळ, मोत्याची माळ, चंदनहार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा यांची मांडणी दुकानदारांनी केली आहे. यात वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व झिरमिळ्या, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. दुकानाबाहेर लटकवलेल्या या रंगीबेरंगी फुलांच्या माळा नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये मणी आणि रंगीत धाग्यांनी बनवलेल्या माळांचा समावेश आहे. काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यात बनवलेल्या माळा आहेत. सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगांतील झिरमिळ्या उपलब्ध आहेत.
.........
कोट

कृत्रिम फुलांनाही मागणी आहे. बाजारात विविध प्रकारची फुले ६० ते १३० रुपये डझन ग्रास्मेट १०० ते १५० रुपये, बोन्साई फ्लॉवर पॉट, हँगिंग फ्लॉवर चारशे रुपये डझन, झेंडू मळा ५० पासून १५० पर्यंत उपलब्ध आहे. प्लास्टिक हार शंभर ते दोनशे रुपये, मोतीहार ३० रुपयेपासून उपलब्ध आहे.

- सचिन गोसावी-विक्रेता, भोगाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Pune Crime : कल्याणीनगर अपघात प्रकरण; अल्पवयीन मुलाला जामीन देणारे जेजेबीचे दोन सदस्य बडतर्फ

Cocaine Seized: धक्कादायक! 200 किलो कोकेन जप्त, सुमारे 2 हजार कोटींचा माल हस्तगत, मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश

Ranji Trophy 2024: भारताचा कर्णधार मुंबईच्या रणजी संघातून खेळणार; महाराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरणार

Dombivli News: कल्याण परिमंडलातील 2 हजार 437 ग्राहकांना अभय योजनेचा लाभ; 94 लाख रुपये माफ !

SCROLL FOR NEXT