कोकण

कणकवलीत पाच ऑक्‍टोबरला आरक्षण बचाव यात्रा ः राणे

CD

14250

कणकवलीत ५ ऑक्‍टोबरला
आरक्षण बचाव यात्रा ः राणे

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ : काँग्रेस सत्तेवर आल्‍यास आरक्षण संपवू अशी भूमिका काँग्रेसचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. मात्र, आरक्षण आमचा हक्‍क आहे. आम्‍ही आरक्षण घालवू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले. तसेच आरक्षण बचाव करण्यासाठी आम्‍ही महायुतीच्या माध्यमातून ५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता कणकवली येथे ‘आरक्षण बचाव’ यात्रा काढणार असल्याची माहिती त्‍यांनी दिली.
येथील प्रहार भवनमध्ये आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ‘राहुल गांधींचे वक्तव्य म्‍हणाजे संविधानाने मागासवर्गीय समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिला आहे, तो संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला दिसतो. मागासवर्गीय समाजाला शिक्षण, नोकरी व इतर स्तरावर जो अधिकार मिळाला आहे, तो काढून घेण्याचे व आरक्षण संपविण्याचे काम राहुल गांधी व काँग्रेसकडून होईल, असे दिसते. आम्ही याला विरोध करणार आहोत.’’ श्री.राणे म्‍हणाले, ‘‘महायुतीच्या घटक पक्षांसोबत आम्‍ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जानवली पुलाकडून ही आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत. ही पदयात्रा कणकवलीतील बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. तेथे सभा होईल. त्‍यानंतर महायुती शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही दिले जाणार आहे. सन १९३८ मध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे कणकवलीत आले होते. जानवली येथील नदीकिनारी त्यांची परिषद झाली होती. त्‍यामुळे आरक्षण बचाव यात्रेची सुरूवातही जानवली येथून करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. यावेळी आरपीआय आठवले गटाचे अजितकुमार कदम, भाजप मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT