कोकण

माने अभियांत्रिकीच्या आश्लेषा जाधवला दुसरा क्रमांक

CD

- rat३०p१९.jpg-
P२४N१५०७९
मुंबई ः राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या आश्लेषा जाधव सन्मान स्वीकारताना.

आश्लेषा जाधवचा द्वितीय क्रमांक

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव; इंग्लिश स्टोरी रायटिंग ग्रुप बीमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ३० ः मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजित ५७व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आश्लेषा जाधव हिने इंग्लिश स्टोरी रायटिंग ग्रुप बीमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला. सांताक्रुझ मुंबई येथील मोदी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे झालेल्या कार्यक्रमात तिचा गौरव करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १७ महाविद्यालयातील जवळपास ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी या दक्षिण रत्नागिरीसाठी झालेल्या झोनल राउंडमध्ये भाग घेतला होता. त्यातील कॉम्प्युटर विभागातील चार विद्यार्थ्यांनी इंग्रजी वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, स्टोरी टेलिंग तसेच कार्टुनिंग प्रकारामध्ये सुयश संपादन केले होते. त्यामध्ये सुबोध मुनीश्वर याने कार्टुनिंग व पोस्टर मेकिंग या दोन स्पर्धांमध्ये अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकाचे व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले होते. त्याचबरोबर आश्लेषा जाधव हिने इंग्रजी वक्तृत्व ग्रुप बी स्पर्धेमध्ये तर विशालिनी अंकम हिने स्टोरी टेलिंग ग्रुप बीमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले होते. त्यापैकी आश्लेषा हिने अंतिम फेरीमध्ये इंग्लिश स्टोरी रायटिंग ग्रुप बी प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात उदयपूर येथील परीक्षक व संगीत नाटक अॅकॅडमी पुरस्कार विजेते (नवी दिल्ली) विलास जानवे यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.
समारंभाला मुंबई विद्यापिठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. नीलेश सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. महेश भागवत, संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे यांनीही तिचे विशेष अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: संभाजी राजेंनी माझ्या अंगावर माणसे घातली, ६, ७ वाजता कोण दारु पितं? लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केली भूमिका

Govinda Gun Fire: अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, पायाला लागली गोळी; घरात पहाटे काय घडलं?

Congress: विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये भूकंप! दहा नगरसेवकांची पक्षातून का केली हकालपट्टी? भाजपचा आहे थेट संबंध

दलित विद्यार्थ्यांसाठी उघडली 'आयआयटी'ची दारे; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 80 अंकांनी वधारला, सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला

SCROLL FOR NEXT