कोकण

दापोलीत कृषी संस्कृती जगणाऱ्या कृषिसेवक

CD

नवदुर्गा---------लोगो

-rat१०p४०.jpg -
P२४N१८१८८
दर्शना वरवडेकर.
------------
दापोलीत कृषी संस्कृती जगणाऱ्या कृषिसेवक

दर्शना वरवडेकर ; खास शेती शाळातून महिलांना केले सक्षम
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० ः खास महिलांच्या शेतीशाळा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केल्यामुळे अनेक महिला सक्षमपणे भातावरील कीड व रोग ओळखू लागल्या. यासाठी योगदान देणारी एक महिलाच आहे. दापोली येथे कृषिसेवक म्हणून काम करताना दर्शना वरवडेकर यानी कृषी विभागातील अनेक योजना त्यांनी प्रभावीरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
काहीजण सेवेत स्वतःला एवढं वाहून घेतात की, त्यांना आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विसर पडतो आणि असे व्यक्तीमत्व हे केवळ समाजासाठी कायम काहीना काहीतरी करतच राहतात. दापोली तालुक्यातील कृषिक्षेत्रातील एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व दर्शना वरवडेकर त्यापैकी एक. त्यांनी समाजहिताला प्राधान्य देत कृषिक्षेत्रात जनजागृती करत नवनवीन उपक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत त्या आजही समजावून सांगतात. निसर्ग आणि फायद्यातील शेती यात त्या एवढ्या एकरूप झालेल्या आहेत की, कोणत्याही पिकाबद्दल शेतकऱ्यांनी त्यांना विचारावे, त्वरित त्याबाबत माहिती देतात. पिकाचा कालावधी, औषध फवारणी, खते, मालाला मिळणारा बाजारभाव आदींची अचूक माहिती आजपर्यंत शेतकऱ्यांना त्या देत आल्या आहेत आणि अजूनही माहिती पुरवत आहेत. त्यांना कधीही पाहावे तर कोणा ना कोणाच्या शेतावर किंवा शेतीच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळतील. निसर्ग आणि शेतीशी एकरूप झालेल्या वरवडेकर या उत्तम अशा काव्यरचना करतात. निसर्ग आणि समाजातील दुःख, व्यथा यावर आधारित त्यांचे लिखाण अनेक दैनिकात, मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. शेतकऱ्यांकडे एक अधिकारी म्हणून नाही तर माणुसकीच्या नात्याने पाहतात. त्यांना सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी उत्कृष्ट कृषीविस्तार कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाला.
----
या योजना पोहचवल्या
क्षेत्रीय किसान गोष्टी, फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, शेततळे, स्व. गोपीनाथ मुंडे जनता अपघात योजना अशा अनेक योजना वरवडेकर यांनी प्रभाविपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT