कोकण

धम्मक्रांतीमुळे सामाजिक परिवर्तनाला गती

CD

-ratchl१५२.jpg-
P२४N१९१०९
चिपळूण ः दिक्षा मोहिते हिचा सत्कार करताना मान्यवर.
------------------

धम्मक्रांतीमुळे सामाजिक परिवर्तनाला गती

डॉ. ज्ञानोबा कदम ः चिपळुणात धम्मचक्र प्रवर्तन दिन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर केलेली धम्मक्रांती ही जगातील एक अद्भुत क्रांती आहे. या क्रांतीमुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाला प्रचंड गती मिळाली व मूकनायकांचा आवाज बुलंद झाला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी येथे केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण स्थानिक व मुंबई यांच्यावतीने संस्थेच्या चिपळूण येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन झाला.
डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतर का केले? या धर्मांतरचे महत्व काय आहे, हे नव्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. ६०-७० वर्षांपूर्वीचा काळ किती भयानक होता याची जाणीव नव्या पिढीला करून दिल्यावरच डॉ. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे महत्व आपल्या लक्षात येईल. बुद्धांच्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत बुद्ध धम्माची कशा पद्धतीने वाटचाल राहिली, बुद्ध धम्माला राजाश्रय कसा मिळाला याबाबत प्रा. कदम यांनी माहिती दिली.
संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणविचाराचा मागोवा घेतला. या वेळी धम्म ध्वजारोहण धम्म कमिटीचे अध्यक्ष मनोहर कदम, माजी गटविकास अधिकारी अरूण जाधव, उपाध्यक्ष नाना सावंत, बुद्धभूषण गमरे, सरचिटणीस संदेश पवार, सहचिटणीस तुकाराम सकपाळ, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते. विद्यार्थिनी दिक्षा मोहिते हिने मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या कथालेखन स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावून रौप्य पदक मिळवले. त्याबद्दल तिचा संस्थेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT