कोकण

विद्यमान आमदारांकडून अर्ज भरण्याचे मुहूर्त जाहिर

CD

विधानसभा निवडणूक------लोगो

विद्यमान आमदारांकडून मुहूर्त जाहीर

पालकमंत्री सामंत २२ ला भरणार अर्ज ; शक्तीप्रदर्शनाचाही तयारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ पासून सुरू होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप किंवा उमेदवार जाहीर झालेले नसले तरीही उमेदवारी मिळणार हे निश्चित असलेल्यांनी अर्ज भरण्याचा मुहुर्त काढण्यास सुरूवात केली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस निवडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे ३३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार यंत्रणा तळागाळात पोचविण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्ज भरण्याचा मुहुर्त काढला आहे. रत्नागिरी विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत हे २२ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्याला सामंत यांच्या निकटवर्तीयांकडून दुजोरी मिळाला आहे. राजापूर-लांजामधून शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत आणि गुहागरमधून ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव २४ रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. चिपळूण-संगमेश्वरमधील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांनी २८ रोजीचा मुहुर्त काढला आहे. मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल होणार असल्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
-------
महायुतीचा मेळावा

उमेदवारी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मारूती मंदिर येथून विवेक हॉटेलपर्यते फेरी काढली जाईल. तेथून महायुतीचा मेळावा होईल. त्यानंतर सामंत ठरलेल्या मुहुर्तावर अर्ज भरतील असे शिंदे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पराभवाची हॅट्‌ट्रिक करायची असेल, तर राजन तेलींनी निवडणूक लढवावी'; दीपक केसरकरांचं थेट चॅलेंज

Latest Maharashtra News Updates Live : मुंबईत सर्वाधिक जागा भाजपला मिळणार?

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

SCROLL FOR NEXT