महाड : राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जानेवारी ते मार्च २०२४ ला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत घेणे शक्य होत नसल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. महाड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी आपल्या अधिकारानुसार, येथे प्रशासकांची नेमणूक केली आहे. नेमलेल्या प्रशासकही महाड पंचायत समितीचे अधिकारी आहेत.
महाड तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून त्यापैकी २९ ग्रामपंचायतींची जानेवारी ते मार्च २०२४ ला संपली आहे. निवडणूक प्रक्रियेत असलेल्या ग्रामपंचायती बहुसंख्येने महत्त्वाच्या असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनही या ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
बदललेल्या राजकीय गणिताचे भवितव्यही या निवडणुका ठरवणार आहेत. परंतु राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व २९ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे.
२९ ग्रामपंचायतींसाठी नऊ प्रशासक
ग्रामपंचायती २९ असल्या तरी कामकाज सांभाळणारे प्रशासक केवळ नऊ आहेत त्यामुळे एका प्रशासकाला २ ते ३ ग्रामपंचायतींचे काम सांभाळावे लागत आहे. शिवाय हे प्रशासक पंचायत समितीमधील विविध विभागांचे अधिकारी असल्याने त्यांना आपले मूळ पदाचे कामकाज सांभाळून अतिरिक्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासकांना ग्रामपंचायतींच्या कामांसाठी पुरेसा वेळ देता येणार नाही.
निवडणूक आचारसंहिता लागल्याने गावाच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळणाऱ्या प्रशासकांची संख्याही तुलनेने कमी असल्याने परिणाम गावातील विकासकामे खोळंबण्याचे शक्यता ग्रामस्थांना वाटते. या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत प्रशासकांनाच काम पाहावे लागणार आहे.
आंबेशिवथर, कुंभेशिवथर, कसबेशिवथर, दहिवड, खर्डी, किंजळोली बु, तेटघर, वरंडोली, सांदोशी, निजामपूर, दाभोळ, कांबळेतर्फे महाड, वाकी बु, वाळण बु, पाने, आमशेत, वलंग, सोनघर, आकले, जीते, विन्हेरे, वसाप, शिंगरकोंड, पांगारी, रेवतळे, कुंभार्डे, आंबिवली बु, सव व भावे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.