कोकण

प्रॉडक्ट पॅकेजिंग, प्रकार अन् व्यवसायाची संधी

CD

प्रॉडक्ट पॅकेजिंग, प्रकार
अन् व्यवसायाची संधी
पुणे, ता. २५ : प्रॉडक्ट पॅकेजिंग किती आकर्षक आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. मार्केटमध्ये विविध पॅकेंजिंग बघण्यास मिळतात. विशेषतः प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रॉडक्टसची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लास्टिक इ. प्रकारचे पॅकिंग मटेरिअल लागते. हे मटेरिअल कसे बनवितात, त्यासाठी कोणती यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी भांडवल इ.विषयी सविस्तर माहिती करून देणारा चार विकेंडचे ऑफलाइन प्रमाणपत्र प्रशिक्षण २७ एप्रिल ते १९ मे दरम्यान आयोजिले आहे. ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे याआधी याच विषयावर झालेल्या सहा प्रशिक्षणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा एकदा हे प्रशिक्षण होत आहे.
या प्रशिक्षणात पॅकेजिंग इंडस्ट्रीतील ३० वर्षांहून अधिकचा अनुभव असलेले नामवंत सल्लागार शैलेश जयवंत मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्ट-अप सुरु करायचे आहे, तसेच पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील तंत्रज्ञान जाणून घ्यायचे आहे आदींसाठी हे प्रशिक्षण फायदेशीर ठरणार आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी दोन पॅकेजिंग उद्योगांना क्षेत्र भेटीचे नियोजन आहे. ज्यांना आपल्या प्रॉडक्टसाठी विशेष पॅकेजिंग डिझाइन करून हवे असेल त्यांच्यासाठी सशुल्क सेवा देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणातील विषय...
पॅकेजिंग तंत्रज्ञान माहिती व ओळख
पॅकेजिंगसाठी लागणारे विविध प्रकारचे मटेरिअल
इंडस्ट्रीप्रमाणे लागणारे पॅकेजिंग
पॅकेजिंग मटेरिअल बनविण्याची पद्धती
लेबल व प्रिटींग टेक्नॉलॉजी
आवश्यक यंत्रे
पॅकेजिंग डिझाईन
पॅकेजिंग टेस्टिंग व त्याचे पॅरामीटर
छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१ किंवा ९३५६९७३४२७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT