tour of konkan of vinayak raut in ratnagiri two parties are involved 
कोकण

शिवसेनेने मारली बाजी ; राष्ट्रवादीचाही धडाका, महाआघाडीत एकी नसल्याचे चित्र

सकाळ वृत्तसेवा

देवरूख (रत्नागिरी) : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या तालुका दौऱ्यापाठोपाठ चिपळूण-संगमेश्‍वरचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनीही काल या भागात दौरा केला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असली आणि हे दोन्ही पक्ष त्यात सहभागी असले तरीही दोन्ही पक्षनेते आपापल्या परीने आपापल्या पक्षांची ताकद वाढवताना दिसत आहेत. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे तीन भिन्न विचारधारेचे पक्ष केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले आहेत. राज्यात या तीन पक्षांची आघाडी असली तरीही स्थानिक पातळीवर मात्र अद्यापतरी या पक्षांमध्ये एकी झाल्याचे चित्र नाही. गेल्या वर्षभरात सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचे मोठे संकट आले. या संकटातही हे तीन पक्ष आपापल्या ताकदीनुसार काम करताना दिसत होते. यानंतर हे संकट कमी होत असताना आणि देशभरात अनलॉक सुरू असतानाच आता बऱ्यापैकी विकासकामांना सुरवात झाली आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी कोसुंब आणि ओझरेखुर्द जिल्हा परिषद गटाचा दौरा करून तब्बल १५ विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने केली. या दौऱ्यात शिवसेनेकडून चांगलेच शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले. कोरोना काळात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यात शिवसेनेला बऱ्यापैकी यश आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी या मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी कोसुंब गटात धडाकेबाज दौरा करत विविध कामांची चर्चा, पाहणी तसेच मंजूर कामांची भूमिपूजने केली. या दौऱ्यातही राष्ट्रवादीने शक्‍तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली.

बळ आजमावताना दिसत आहेत

एकाच आघाडीतील दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे एकाच गटात ते सुद्धा एकामागोमाग एका दिवशी होणारे दौरे चर्चेचा विषय बनले आहेत. राज्यात एकी असताना स्थानिक पातळीवर मात्र हे पक्ष आपापले बळ आजमावताना दिसत असून यातून आगामी पंचायत समिती निवडणुकांसाठी जादा जागांची मागणी करण्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT