कोकण

एसटी बसमुळे कशेडी बोगदा मार्गावर वाहतूककोंडी

CD

- rat७p५.jpg-
२४M८८५९३
कशेडी बोगद्यामधून मार्गस्थ होत असलेली छोटी वाहने.

एसटीमुळे कशेडी बोगदा मार्गावर वाहतूककोंडी

बंदीचे उल्लंघन; रामदास कदम यांच्याकडून तत्काळ दखल

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात अवजड वाहतूक व एसटी बसेस यांना बंदी घातलेली असतानाही पोलादपूर बाजूकडून खेड दिशेने जाण्यासाठी एसटी चालकाने बस कशेडी बोगदामार्गे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झाली, अशी माहिती या मार्गावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.
कशेडी बोगदा अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तरीही अनेकजण वाहने कशेडी बोगदामार्गे मार्गस्थ करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने एसटी बस बोगद्यातून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेले अडथळे आणि लहान वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली. बोगद्यातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे हे माहिती असूनसुद्धा एसटी चालकाने बस या मार्गावरून नेली. याची गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूककोंडी झाली होती. तेव्हा नेमके शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम हे खेड बाजूकडून मुंबईकडे जात होते. वाहतूककोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एसटी बसचालकाने या मार्गावर बस आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतूककोंडी झाल्याचे समजताच कदम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आहेत.
----
संबंधितांवर कारवाई करावी

वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरून फक्त हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यासाठी या ठिकाणी कमान उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्या कमानीमधून मोजकीच वाहने जातील, अशी व्यवस्था केलेली आहे; मात्र तरीही एसटी परिवहन विभागाकडून अशा पद्धतीने चुका होत आहेत. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT