चिपळूण : परशुराम घाटामधून १४ तासांनंतर वाहतूक sakal
कोकण

चिपळूण : परशुराम घाटामधून १४ तासांनंतर वाहतूक

दरड दुर्घटनेनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट १४ तासांनंतर बुधवारी सकाळी खुला करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : दरड दुर्घटनेनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट १४ तासांनंतर बुधवारी (ता. ९) सकाळी खुला करण्यात आला. दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केल्यानंतर येथे सुमारे ३०० मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

तसेच भूवैज्ञानिकांचे पथकदेखील पाहणी करणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.दरड कोसळल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्णतः बंद केली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटाची पाहणीदेखील केली. तसेच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली. बुधवारी दुपारी प्रथम एकेरी व नंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT