कंपनीमध्ये नव्याने आलेले अधिकारी हे चालकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत. त्यामुळेही वाहतूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रत्नागिरी : येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून (Ultratech Cement Company) सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकना ठरलेले भाडे मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे त्रस्त ट्रकमालकांनी आजपासून (ता. २३) सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे दीडशे ट्रक जागेवर उभे राहणार आहेत. या ठिकाणाहून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करण्याचा कुणी प्रयत्न केला तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा रत्नागिरी जिल्हा मोटारमालक असोसिएशनने दिला आहे.
रत्नागिरी एमआयडीसीतील (Ratnagiri MIDC) अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य ठिकाणी सिमेंटची वाहतूक होते; मात्र गेल्या काही महिन्यापासून युनियनने ठरवलेले भाडे कंपनीकडून मिळत नसल्याचे ट्रकमालकांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे यापुढे जेवढा माल तेवढेच भाडे मिळावे यांसह अनेक मागण्या युनियनकडून केल्या आहेत.
विशेषत: ४० टनापेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या बंद करण्यात याव्यात व स्थानिक गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. कंपनीमध्ये नव्याने आलेले अधिकारी हे चालकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत. त्यामुळेही वाहतूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कंपनीच्या पार्टीने गाडी खाली करून घेतली नाही तर ७०० रुपये भत्ता आणि दुसऱ्या दिवशी खाली केली तर २ हजार रुपये भरपाई मिळावी.
युनियनला नोंदणी झाल्याशिवाय नवीन गाड्यांना परवानगी देण्यात येऊ नये यांसह अनेक मागण्या असोसिएशनने निवेदनाद्वारे कंपनीकडे केल्या आहेत. याबाबत वेळोवेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी असोसिएशनने संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे असोसिएशनने सांगितले. वाहतूकदारांबाबत योग्य निर्णय होत नसल्याने आजपासून (ता. २३) रत्नागिरी जिल्हा मोटरमालक असोसिएशनने सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अल्ट्राटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ठरलेले भाडे दिले जात नाही. त्यामुळे उद्यापासून सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वाहतूकदारांना डावलत जर वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल.
-प्रदीप साळवी, उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मोटरमालक असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.