utkarsh Plus scheme Records of Limca Book in sindudurg kokan marathi news 
कोकण

सॅनेटरी नॅपकिनची नोंद झाली लिम्का बुकमध्ये...

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून महिला वर्गात मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्यासाठी ‘उत्कर्ष प्लस’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेने २४ जानेवारी २०१९ ला जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती, ८ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी केवळ ३ तासांच्या हळदी कुंकु कार्यक्रमात ६६ हजार ७०७ महिलांना ४ लाख २४२ सॅनेटरी नॅपकिन स्वच्छतेचे वाण म्हणून वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेने महा हळदीकुंकु कार्यक्रमात वाटप केलेल्या सॅनेटरी नॅपकिनची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाल्याबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने सुरु असलेल्या उत्कर्षा प्लस कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन वाटप करून मासिक पाळी प्रबोधन करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. ८४ टक्के किशोरवयीन मुली याचा वापर करत असून शिक्षण घेत नसलेल्या १६ टक्के मुली वापर करीत नाहीत. अंगणवाडी सेविकेंच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक लाख महिलांचा करण्यात आलेल्या सर्व्हेत जिल्ह्यातील ५२ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 


‘स्वच्छतेचे वाण’ वाटप
यामध्ये २५ वर्षांवरील महिलांचा समावेश होता. त्यामुळे सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन महिलांना हे ‘स्वच्छतेचे वाण’ वाटप करण्याचा निर्णय मी जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून असताना घेण्यात आला होता.’’यासाठी गावातील महिलांना मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच वितरित करण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन हे वाण उच्य दर्जाचे असणार आहे. पाच पॅडचे एक पॅक एका महिलेला देण्याचे निश्‍चित करून त्यासाठी लागणारा निधी ग्रामपंचायतीला देण्यात आला होता.

’लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

त्यानुसार २४ जानेवारी २०१९ ला जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती, ८ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयात एकाच वेळी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत महा हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करून या ३ तासांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६६ हजार ७०७ महिलांना  ४ लाख २४२ सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाची माहिती ‘लिम्का बुक रेकॉर्ड’ यांना ४ एप्रिलला देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्याच्या या उपक्रमाची ’लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली. 

सर्वांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी
तत्कालीन सीईओ शेखर सिंह यांनी किशोरवयीन मुलींसाठी जिल्हा पानी व स्वच्छता विभागामार्फत उत्कर्षा योजना सुरु केली होती. त्यानंतर यात सर्व महिलांचा समावेश करून उत्कर्षा प्लस योजना सुरु करून सॅनेटरी नॅपकिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पीरषदच्या सर्व विभागांनी प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळेच ‘लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा! विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT