मालवण (सिंधुदूर्ग) : पर्ससीन नेट मासेमारीचा बंदी कालावधी सुरू आहे. यामुळे मालवणच्या किनारपट्टीसह बंदरात उभ्या असलेल्या पर्ससीनच्या नौकांवरील जाळी धडक कारवाई करून तत्काळ उतरवावी, अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी आज सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त नागनाथ भादुले यांना दिली.एलईडी मासेमारी व परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरू असल्याच्या तक्रारी मच्छीमारांनी केल्या आहेत. त्यामुळे एलईडी व हायस्पीड नौकांवरही गस्तीनौकेद्वारे पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याची सूचनाही आमदार नाईक यांनी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना केल्या.
येथील सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात प्रभारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून नागनाथ भादुले यांच्याकडे पदभार आहे. आमदार नाईक यांनी आज श्री. भादुले यांची भेट घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, तपस्वी मयेकर, सन्मेश परब आदी उपस्थित होते.
परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी
अनधिकृत पर्ससीननेटच्या मासेमारीवर कारवाई करा. त्याचबरोबर बंदी कालावधीत ज्या परवानाधारक पर्ससीननेटच्या नौकांवर पर्ससीनची जाळी आजही कायम असल्याचे दिसून येत असल्याने त्यावर कारवाई करा. त्यांच्या नौकांमधील जाळी उतरविण्याची कार्यवाही करा. कोणी पर्ससीनधारक आम्ही राज्याच्या हद्दीबाहेर मासेमारी करतो असे सांगत असल्यास त्यांच्याकडे तसा परवाना आहे का याची तपासणी करण्याची सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याशी संपर्क साधून मत्स्य व्यवसाय विभागास सहकार्य करावे, असे सांगितले. आणखी एक गस्तीनौका उपलब्ध करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
उद्यापासून मोहिम हाती
आचरा येथे मोठ्या प्रमाणात पर्ससीननेटच्या नौका आहेत. त्या नौकांवरही पर्ससीनची जाळी असून त्यांच्याकडून अवैधरीत्या मासेमारी होऊ शकते. त्यामुळे आचरा किनारपट्टी भागात धडक कारवाई मोहिम राबवीत नौकांची तपासणी करा. पर्ससीनच्या जाळ्या उतरविण्याची कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दिल्या. त्यानुसार उद्यापासून किनारपट्टीवर कारवाई मोहिम हाती घेतली जाईल
- नागनाथ भादुले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.