Rajesh Tawde sakal
कोकण

Vaibhavwadi : नाधवडेतील तावडेंना ‘कृषिभूषण’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

आपल्या बारा वर्षाच्या कारर्कीदीत १०० हुन अधिक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे केले

वैभववाडी : प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून (कै.) विवेकानंद नाईक द्वितीय स्मृतिदिन आणि वैभव कृषिभूषण पुरस्कार वितरण सोहळा येथील आंबेडकर भवनात आयोजित केला होता. यंदाचा वैभव कृषिभूषण पुरस्कार नाधवडे येथील प्रयोगशील शेतकरी राजेश तावडे यांना देण्यात आला.

यावेळी माजी सभापती बाप्पी मांजरेकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रमोद रावराणे, आशालता नाईक, विलास देसाई, विठोबा सावंत, महेश रावराणे, मंगेश कदम आदी उपस्थित होते. संघाचे संचालक रावराणे यांनी, मंडळ कृषी अधिकारी नाईक यांनी तालुक्याच्या शेतीक्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.

त्यांनी कृषी खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. आपल्या बारा वर्षाच्या कारर्कीदीत १०० हुन अधिक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचा आदर्श कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांसाठी ऊन, वारा, पाऊस याची कधीच तमा नाईक यांनी बाळगली नाही. त्यांनी उभे केलेले शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत.

तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, असे श्रीमती नाईक यांनी सांगितले. ‘प्रवण’चे महेश संसारे यांनी भविष्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. शेती, शेतमाल प्रकिया यावर चर्चा करून उद्योग उभे करायला हवेत. आंबा, काजूवर प्रक्रिया होतेय; परंतु अजूनही कित्येक फळांवर प्रकिया होताना दिसत नाही. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi CM Atishi: आमदार झाल्यानंतर चौथ्याच वर्षी मुख्यमंत्री; ऑक्सफोर्डमध्ये शिकलेल्या आतिशी यांनी कसा केला चमत्कार?

Ganesh Visarjan 2024 LIVE: मानाचे पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत झाले सहभागी

Jio Network Outage in Mumbai : मुंबईत जिओ नेटवर्क ठप्प; ग्राहकांना मोठा धक्का,कारण अद्याप अस्पष्ट

Latest Maharashtra News Updates : जगभरात भारताची ओळख याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते - अजित पवार

Lalbagh Raja Visarjan: स्टेजवर जाऊ दिलं नाही! 'लालबागचा राजा' महिला कार्यकर्त्याची पोलिसांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT