वैभववाडी (सिंधुदुर्ग) : पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य जनतेला उध्वस्त करणे हे एकमेव धोरण केंद्राचे आहे, अशी टिका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी येथे केली.
कोळपे-जमातवाडीतील (Kolpe Jamatwadi) ५० हुन अधिक आणि कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील ६० हून अधिक विविध पक्षाच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, निलम पालव, सुशांत नाईक, नंदु शिंदे, मंगेश लोके, गितेश कडु, इसार शेख, गौस पाटणकर, जावेद पाटणकर, प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, "केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल लवकरच १२५ रूपयांचा टप्पा पार करेल. गॅस १ हजार रूपयांवर पोचला आहे. जीवनावश्यक वस्तुचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना जगणे महाग झाले आहे. सामान्यांना उध्वस्त करण्याचे धोरण केंद्राचे आहे. महाराष्ट्राला वैचारीक पंरपरा आहे. या राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले; परंतु देवेंद्र फडणवीस इतका खुर्चीचा हव्यास कुणीही केला नाही. सुरूवातीला येणार म्हणून सांगीतले ते आलेच नाही; परंतु गेल्यानंतर देखील गेलो तरी आहे असे सांगत आहेत."
केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर देखील त्यांनी टिका केली. ते म्हणाले, "पदासाठी अनेक पक्ष राणेंनी बदलले. राणेंनी सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टिका केली होती; परंतु त्यांच्यावर कधी कारवाई झाली नाही; पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर टिका केली तर तुरूगांत जावे लागते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. मोदीवर राणेंनी इतकी टिका कुणीच केलेली नाही. तरी देखील सध्या राणे हे भाजप पक्षात आहेत. नैतिकता हा प्रकार त्यांच्याकडे नाहीच. कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते आहे. २०१४ पासून कोकणात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. आजच्या प्रवेशाने हा झंझावात कायम सुरू आहे हे सिध्द होत आहे. ज्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यांना सन्मानाची वागणुक दिली जाईल. विकास प्रकियेत सामावून घेतले जाईल."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.