Narayan Rane Vinayak Raut Google
कोकण

नारायण राणेंचा 'तो' इशारा म्हणजे धमकीच ; विनायक राऊतांचा आरोप

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : कुडाळमधील (Kudal) भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केंद्राचा मंत्री आहे, याचे भान विसरून निवडणुकांमध्ये गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच; पण दुसरे काय करायला लावू नका, असे सांगत जी धमकी दिली ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे या जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, पुन्हा या जिल्ह्यात राणेंच्या माध्यमातून रक्तलांछित राजकारण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या प्रामाणिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे संरक्षण करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांना उद्या (ता.१) निवेदन सादर करणार असल्याचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मालवण दौर्‍यावर आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर, नागेंद्र परब, नितीन वाळके, मंदार केणी, गणेश कुडाळकर, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राऊत म्हणाले, कुडाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय उद्योगमंत्री राणे यांनी आपण केंद्राचा मंत्री आहे याचे भान विसरून भाजप कार्यकर्त्यांना मारण्याची किंबहुना त्यांचे जीवन संपविण्याची धमकी दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच; पण दुसरे काय करायला लावू नका याचा अर्थ राणेंचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीला त्यांच्याच पक्षाच्या लोकांना जीवन संपवायचे, डोकी फोडायची रक्तरंजीत राजकारण करायचे हे आजपर्यत राणेंचा भूतकाळ होता.

सुदैवाने 2014 पासून शिवसेना विजयी झाल्यानंतर आजपर्यत कोणत्याही निवडणुकीत नरबळी देणे किंवा डोकी फोडणे असे प्रकार घडले नाहीत. पुनःश्‍च एकदा या जिल्ह्यात रक्तलांछित असे राजकारण नारायण राणे यांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते असे त्यांच्या मेळाव्यातील भाषणावरून दिसून येते. म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याकडे उद्या लेखी निवेदन देणार आहे. या जिल्ह्यातील भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्राने घ्यावी आणि राणेंना केंद्राच्या माध्यमातून जसे संरक्षण दिले त्याच पद्धतीचे संरक्षण या जिल्ह्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना द्यावे आणि त्यांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा राणे पुरस्कृत गुंडगिरीतून त्यांचा जीव जावू शकतो.

प्रामाणिकपणे काम करणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आता संकटात आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून कार्यकर्त्यांना दादागिरी, त्यांची कान उघडणी करणे, भाजपचे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असतील यांना जो त्रास होतोय. यात जी भाजपची लोक गप्प बसली आहेत. त्यांना जी राणेंनी दमदाटी केली याची दखल पंतप्रधानांनी घ्यावी. भाजपचा जुना जाणता कार्यकर्ता वाचायचा असेल तर त्याचे संरक्षणाची जबाबदारी पंतप्रधानांनी घ्यावी.असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT