Watch over civilians clinging to police drones 
कोकण

चिपळून पोलिस ड्रोनद्वारे ठेवणार नागरिकांवर वॉच

मुजफ्फर खान

चिपळूण : संचारबंदीच्या काळात विनाकारण गर्दी करणारे आणि कारण नसताना रस्त्यावरून फिरणाऱ्या रिकामटेकड्यांविरोधात चिपळूण पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहेत. चिपळूण पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करायला सुरवात केली आहे. चिपळूण शहरासह खेर्डी, बहादूर शेख नाका, गोवळकोट, गोवळकोट रोड परिसराचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून फिरणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास पोलीसाना सोपे होणार आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सकाळ'ला दिली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीर राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी आहे. चिपळून परिसरात सुरुवातीचे काही दिवस नागरिक घराबाहेर पडत नव्हते. जे रिकामटेकडे रस्त्यावर फिरायचे त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळायचा. शिरगाव, पिंपळी, बहादूरशेख नाका, फरशीतिठा, महामार्ग, सावर्डे, गुहागर बायपास या ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके कार्यरत आहेत पण दोन दिवस पोलिसांची कारवाई सौम्य झाल्यानंतर येथील जनजीवन पुन्हा सुरळीत झाले होते. दुकाने उघडण्यात आली होती. खरेदीसाठी लोकांची गर्दी सुरू होती. चिपळ्रण शहर. गोवळकोट रोड, खेर्डी परिसरात लोक चक्क रस्त्यावर फिरत होते. लहान मुले रस्त्यावर मोकळ्या मैदानात खेळत होते. कोणालाच कोरोनाची भिती वाटत नाही. लोक चक्क घोळका करून गप्पा मारत आहेत. अशांच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर करायला सुरुवात केली आहे. ड्रोन द्वारे चिपळूण शहर आणि उपनगराचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणात जे जे रस्त्यावर फिरताना आढळतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत

चिपळूणमधील सर्व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून 24 तास सेवा बजावत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये ही त्यांची जबाबदारी आहे. तरीसुद्धा लोक ऐकत नाहीत. अशांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढील पाऊल उचलले आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. चित्रीकरणात जे आढळतील त्यातील कोणाचीही हयगय न करता पोलीस कारवाई करतील.

-नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT