उन्हाचा तडाखा sakal
कोकण

रत्नागिरी : उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. सर्वसाधारणपणे या राज्यांत १५ मेनंतर उष्णतेचा कहर जाणवतो. मात्र, यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस देशातील किमान ५ राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा, हरियाना आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये पुढील काही दिवस तीव्र ऊन असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा कहर कायम राहणार असून ४ ते ७ मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे उष्णतेत काहीसा दिलासा मिळू शकतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. दिल्लीचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.

वीजकपातीचाही त्रास

एकीकडे उष्णतेने कहर केला आहे, तर दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संकटात भर पडली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही अनेक तास वीजकपात केली जात आहेत. राजस्थानमध्ये दररोज सुमारे चार तास कारखान्यांमधील वीजपुरवठा खंडित होत आहे. गुजरात आणि आंध्र प्रदेशने याआधीच निवासी भागांना पुरवठा करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील वीज खंडित केली आहे. राजस्थान सरकारने ग्रामीण भागात चार तास वीज कपात सुरू केली असून, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

१२२ वर्षांतील सर्वाधिक उष्णता

उत्तर भारतात मार्च महिन्यात गेल्या १२२ वर्षांमध्ये सर्वाधिक उष्णता जाणवली आहे. या व्यतिरिक्त सरासरी कमाल तापमान देखील ३०.६७ अंश सेल्सिअस आहे, जे २००४ नंतरचे सर्वोच्च आहे. देशातील मुख्यमंत्र्यांसोबत काल (ता. २७) झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली असून, त्यावर मात करण्यासाठी उपाय करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT