sindhudurga sakal
कोकण

सिंधुदुर्ग : तेरेखोलच्या महापुरावर उतारा कधी?

नदीतटावरील गावे अस्वस्थ; गाळ काढण्यासाठी शासनाच्‍या पुढाकाराची गरज

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे(heavy rain) आलेल्या महापुरात नदीकाठच्या लोकांचे झालेले नुकसान आणि सोसावे लागणारे हाल अख्खा महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तरी लोक सुरक्षित राहतील का? आणि गाळ काढण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे गाळाने भरले आहेत. त्यामुळे नदीपात्रे उथळ झाल्याने पूर आल्यावर पाणी लोकवस्तीत घुसते. सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदी पात्राच्या शेजारी असणाऱ्या बांदा, इन्सुली, वाफोली, विलवडे, माडखोल अशा भागात पुराचे पाणी लोकवस्तीत घुसत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र पावसाळ्यात पाहायला मिळते. त्यामुळे घरगुती किंमती सामानाचे नुकसान होण्याबरोबरच दुकानाचेही मोठे नुकसान होते. शेती बागायती, स्थावर मालमत्तेचेही नुकसानही सोसावे लागते.

जंगलातील बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर - दऱ्यांमधील होणारी धूप यामुळे नदी-नाले गाळाने भरले आहेत; मात्र हा गाळ कधी काढल्याचे ऐकिवात नाही. नदी नाल्यातील पाण्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावे समृद्ध होती. या नदी- नाल्यांच्या पाण्यावर लोक दुबार शेती आणि भाजीपाल्यासह नागली पिके घेत असत त्याशिवाय शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी देखील पाणी चारा मिळत होते; मात्र सध्या नदी नाल्यांची पात्रे उथळ झाल्याने आणि नदी पात्रात मधोमध दोन प्रवाह निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नदी-नाल्यातील पाणी वाट मिळेल तेथे धावत आहे. परिणामी नदी पात्रात पाणी साचून राहत नसल्याने मे महिन्यात नद्या कोरड्या पडत आहेत.

ठोस भूमिका आवश्‍यक

जिल्ह्यातील नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी एकतर सरकारने ठोस भूमिका घ्यावी किंवा श्रमदानाने गाळ काढण्यासाठी मुभा देऊन यामध्ये सापडणारी वाळू गावाने किंवा संबंधित प्रशासनाला देण्याची व्यवस्था करावी, ग्रामपंचायत प्रशासनाला पात्रातील गाळ काढून त्याचे योग्य नियोजन करण्याचे अधिकार द्यावेत, त्यासाठी सरकारने नियमावली करावी. तालुक्यात तेरेखोल नदी शेजारील बांद्यासारख्या शहरात तसेच परिसरात अनेक उद्योजक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देते; मात्र महापुरात नुकसान झाल्यास विमा देताना हात आखडता घेते. विमा कंपन्यांच्या बाबतीतही हा प्रकार पाहायला मिळतो.

काय करायला हवे?

याबाबत शासनाने निर्णय घ्यायला हवा तसेच बांदा तेरेखोल नदी पात्र व धोकादायक पातळी आणि सायरन वाजवण्यासाठीच्या योजना देखील आतापासूनच कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तेरेखोल नदी पात्राच्या भरती पातळीपर्यंत वाळू उपसा करण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे झाल्यास पूरपरिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होऊ शकते.

सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. गाळ काढण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीला सोपविण्यात येणार आहे. सांगेली ते बांदा इथंपर्यंत हे काम असून गाळातून मिळणाऱ्या वाळूचा उपयोग केला जाणार आहे. जानेवारीच्या शेवटपर्यंत हे काम सुरू होण्याची आशा आहे.

- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT