women delivery on road at ratnagiri 
कोकण

विकसनशील भारतातील 'या' गावात आजही नाही रस्ता ; मातेने बाळाला दिला डोलीतच जन्म 

नागेश पाटील

चिपळूण - तालुक्यातील पेढांबे धनगरवाडी येथील एक महिला रस्त्यातच प्रसुती झाली. धनगरवाडीतून रस्ताच नसल्याने तीला डोलीतून नेण्यात येत होते. त्यावेळी महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. या महिलेस कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. 


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पेढांबे येथील उंचावर असलेल्या दाभाडीवाडी पर्यंत वाहतुकीसाठी रस्ता झालेला आहे. त्यापुढेही डोंगरात असलेल्या धनगरवाडीत मात्र अद्याप रस्ता झालेला नाही. धनगरवाडीतील ग्रामस्थ व महिला नेहमी गावात येण्यासाठी पायीच प्रवास करतात. मात्र वाडीतील एखाद्या आजारी व्यक्तीला रूग्णालयात न्यावयाचे झाल्यास डोली करून न्यावे लागते. परिणामी आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत नेणं जिकरीचे होऊन बसतं. शनिवारी (ता.20) रात्री येथील एका गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. परंतु इतक्या रात्री पायवाटेने आणि आडवाटेने दवाखान्यापर्यंत नेहणार कसं, हा मोठा प्रश्न होता. 108 शासकीय रूग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. प्रसुती वेदना वाढल्याने पहाटे पाचच्या सुमारास या कुटुबाने आरोग्य कर्मचार्‍यांशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर सबंधीत आशा सेविकेने या महिलेला नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. धनगरवाडीतून खाली दाभाडीपर्यंत या महिलेस डोलीतून आणले जात होते. तोपर्यंत वाटेतच या महिलेची प्रसुती झाली. त्यानंतर काही वेळातच आरोग्य सेविकेने खासगी वाहनाने या महिलेस कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वाटेतच प्रसुती झाल्याने महिलेस मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. आरोग्य सेविका, आशा सेविकेनेही तत्परता दाखवल्याने या महिलेस दिलासा मिळाला.  धनगरवाड्यांमध्ये रस्तेच नसल्याने त्याचा फटका आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना बसतो.

तालुक्यातील धनगरवाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरही अद्याप पायाभूत सेवा सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. बहुतांशी धनगरवाड्यामध्ये वाहतुकीसाठी रस्तेच नाहीत. तालुक्यातील पेढांबे धनगरवाडी येथेही अशीच अवस्था आहे. त्यामुळे ही अवस्था ओढवली.


पेढांबे येथील दाभाडीवाडीपर्यंत पूर्वी रस्ता नव्हता. यावर्षी या वाडीपर्यंत वाहतुकीसाठीचा रस्ता झालेला आहे. येथील धनगरवाडी डोंगरात असून नियोजित रस्त्याच्या ठिकाणी जागा कोणाच्या आहेत. याची माहिती देण्याची सूचना धनगरवाडीतील ग्रामस्थांना केली आहे. जमीनमालकांचा शोध घेतल्यानंतर जागेच्या बक्षिसपत्रासाठी त्यांना विनंती करता येईल. त्यानंतर रस्त्यासाठी निधीची अडचण भासणार नाही.

-प्रतापराव शिंदे, तालुकाप्रमुख शिवसेना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT