कामाक्षी देवी शेतकरी महिला उत्पादक गट sakal
कोकण

womens-day : खतनिर्मितीतून महिला सक्षमीकरणाकडे

रोजगाराचा नवा मार्ग; मळगावातील गांडूळ खतप्रकल्प

रुपेश हिराप

सावंतवाडी: एखाद्या महिलेने मनात आणले तर काहीही साध्य करु शकते हे मळगाव येथील स्नेहल हरमलकर यांनी दाखवून दिले आहे. केवळ महिला सक्षमीकरणाचा उद्देश समोर ठेवत श्री कामाक्षी देवी शेतकरी महिला उत्पादक गटाच्या माध्यमातून गांडूळखत प्रकल्पात उतरत महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

मळगाव येथील स्नेहल हरमलकर या पूर्वाश्रमीच्या छाया शिरोडकर. लग्नानंतर मुंबई येथे त्या आपल्या नवऱ्याच्या चष्मा व्यवसायात गुंतल्या. तेथील व्यवसायाचा अनुभव गाठीशी असतानाच त्यांनी सावंतवाडी येथे नवीन चष्म्याचे दुकान सुरू करून व्यवसायामध्ये उडी घेतली. व्यवसाय करत असतानाच महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या हाताला रोजगार देण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. अशातच बचत गटासंदर्भात कुठलाही अनुभव नसताना त्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अंतर्गत ‘श्री कामाक्षी देवी शेतकरी महिला उत्पादक गटा’ची निर्मिती केली. सुरुवातीला म्हणजे २०१९ मध्ये प्रकल्प अभियानामार्फत समुदाय संसाधन व्यक्ती हा दर्जा प्राप्त करत कामाला सुरुवात केली

यावेळी महिलांच्या गाठीभेटी, त्यांना प्रकल्पासंदर्भात माहिती देणे आदी कामे केली. हळूहळू त्यांना वेगळा व्यवसाय करण्याची इच्छा मनामध्ये येऊ लागली. यातूनच त्यांनी पाच महिलांची सोबती म्हणून निवड करत गांडूळ खत प्रकल्पामध्ये व्यावसायिकदृष्ट्या उतरण्याचे धाडस केले. इतर कुठलेही व्यवसाय भविष्यात बंद होऊ शकतात; परंतु कृषीवर आधारित व्यवसाय कधीच बंद होऊ शकत नाही, हा कोरोना काळातील अनुभव पाहता त्यांनी गांडूळ खत प्रकल्प करण्याचा निश्चित केला. यासाठी त्यांनी अभियाना अंतर्गत कर्ज प्रकरण करत त्यातून मळगाव-रस्तावाडी येथे हा प्रकल्प सुरू केला.

त्यासाठी मळगावच्या कृषी व्यवस्थापक प्रिया गावडे यांचे योग्य मार्गदर्शन त्यांना लाभले. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले गांडूळ त्यांनी उपलब्ध करून दिले. या प्रकल्पासाठी लागणारा कच्चामाल म्हणजेच शेणखत व इतर पालापाचोळा हरमलकर यांच्यासहित असलेल्या अन्य पाच महिला काबाडकष्ट करून गोळा करतात. आज प्रकल्प पूर्णत्वास आला असून पाच गांडूळ खत युनिट त्यांनी उभारली आहेत. जवळपास ४५ दिवसानंतर यातून उत्पादन मिळणार असून त्यातून हा प्रकल्प पुढे यशस्वी करण्याचा मनोदय हरमलकर यांनी केला आहे. एकूणच महिलाही आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात उतरून यशस्वी होऊ शकतात हे हरमलकर यांच्यासहित इतर महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रकल्पाला आज अनेक मान्यवर भेट देत असून महिलांच्या कार्याचा गौरव करत आहेत.

पाच महिलांचे अथक परिश्रम

या प्रकल्पातून गांडूळ कल्चर, गांडूळ खत, व्हॅर्मीवॉश, दशपर्णी, अर्क, जीवामृत, डी कम्पोजर आदी उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत प्रकल्पासाठी तालुका अभियान कक्ष सावंतवाडी तालुका व्यवस्थापक, तळवडे प्रभाग समन्वयक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले असून गावातीलच रागिणी शिरोडकर, माधवी शिरोडकर, मयुरी शिरोडकर, समिधा शिरोडकर या पाच महिलांनी या प्रकल्पासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

महिलांसाठी काम करण्याची आवड या व्यवसायात घेऊन गेली. आज रासायनिक खताचा वापर आणि नापीक होणारी शेती, त्याचे मानवी शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. गांडूळ खताला मोठी मागणी असून हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या राबवू.

- स्नेहल हरमलकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT