यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघत आहे.
देवगड : एकीकडे जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत तर दुसरीकडे प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा बँकेची निवडणूकही डिसेंबरमध्येच असल्याने राजकीय पक्षांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. यामध्ये नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघत आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायतीसह वाभवे-वैभववाडी, कसई -दोडामार्ग आणि कुडाळ अशा चार नगरपंचातीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. देवगड जामसंडे नगरपंचायतीची मुदत २२ डिसेंबरला संपणार आहे. तर वाभवे -वैभववाडी आणि कसई -दोडामार्गची मुदत २३ नोव्हेंबर २०२० आणि कुडाळ नगरपंचायतीची मुदत ११ मेस संपली होती.
या चारही नगरपंचायतीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान तर २२ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून निवडणूक निकाल घोषित करण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीतील आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी राजकीय तारांबळ सुरू आहे.
लोकांच्या मनातील आणि निवडून येण्याच्या कसोटीवर उमेदवार देण्याची आवश्यकता आहे. यासाठी राजकीय चाचपणी सुरू आहे. एकीकडे नगरपंचायतीच्या निवडणूकीकडे राजकीय लक्ष असतानाच आता जिल्ह्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा बँकेची निवडणूकीही घोषित झाल्याने राजकीय ताण वाढणार आहे. यासाठी तीन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. यासाठी ३० ला मतदान तर ३१ ला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्याचीही व्युहरचना सुरू झाली आहे. आमदार नीतेश राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पालटले. बहुतांशी सत्तास्थाने भाजपच्या अधिपत्याखाली आली. मात्र अनेक प्रयत्न करूनही जिल्हा बँकेत नेतृत्व बदल झाला नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत राज्यातील भाजप आमदारांची संख्या सर्वाधिक असूनही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवून महाविकास आघाडी करीत राज्यात सत्ता स्थापन केली. हाच फॉर्म्युला नगरपंचायतीसह जिल्हा बँकेत वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरोधी अन्य पक्ष असे समीकरण राहण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. आगामी निवडणूकीत सत्तास्थाने कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे. यासाठी सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचे संकेत आहेत.
वर्षअखेरीस राजकीय धमाका
यंदाची वर्षअखेर सरत्या वर्षाला निरोप देऊन नुतन वर्षाचे स्वागत करण्यापुरती मर्यादित नसून वर्षअखेर राजकीय धमाक्याची राहणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकीबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका असून त्यासाठीही २१ ला मतदान आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणूक आणि मतमोजणी वर्षअखेरीस असल्याने सरत्या वर्षात कोणाला दणका मिळणार आणि कोणाची पहाट होणार याचीही चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.