youth suicide sateli bhedshi konkan sindhudurg 
कोकण

फुटबाॅलपटूचे टोकाचे पाऊल, माता-पित्याचा हंबरडा ऋदय पिळवटणारा

प्रभाकर धुरी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - कोनाळकट्टा येथील शुभम पोकळे (वय 26) या युवकाने बुधवारी (ता. 8) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो गोव्यात एका कंपनीत कार्यरत होता़ मात्र लॉकडाउनमुळे सध्या तो घरीच होता. त्याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत. 

शुभमचा क्रिकेट हा आवडता खेळ होता. शिवाय तो फुटबॉलही बऱ्यापैकी खेळायचा. क्रिकेटमधला अष्टपैलू खेळाडू म्हणून तो तालुक्‍यात परिचित होता. क्रिकेटसह अन्य क्षेत्रातील अनेकजण त्याचे मित्र होते. तो मित्रांच्या गोतावळ्यात कायम वावरणारा, मनमिळावू असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. तो गोव्यातील पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत कामाला होता.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्याने त्याचे काम सध्या बंद होते. त्यामुळे तो घरीच होता. कोनाळकट्टा कॉलनीतील मैदानावर तो सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत फूटबॉल खेळत होता. त्यानंतर तो घरी गेला. आंघोळ केली आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तिथेच त्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ न आल्याने त्याला पाहण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनी त्याला त्या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. माता पित्याची तळमळ पाहून सारेच गहिवरले. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT