सावंतवाडी नगरपरिषद sakal
कोकण

सावंतवाडी : आरोग्य, पाणी, रस्ते स्वच्छतेवर भर

सावंतवाडी पालिका; ३५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी: येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्यानंतर शिलकी अंदाजपत्रक प्रशासनाने मांडले. यामध्ये अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ एवढी आहे.सावंतवाडी नगरपरिषदेवर १७ डिसेंबरपासून प्रशासक म्हणून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर काम पाहत आहेत. तर जयंत जावडेकर हे मुख्याधिकारी म्हणून प्रशासनाचा कारभार हाकत आहेत. प्रशासक श्री. पानवेकर यांनी हे अंदाजपत्रक सादर केले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अंदाजपत्रक प्रशासकामार्फत मांडण्यात आले. नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ एवढी आहे. अंदाजपत्रकात शहर विकासाच्या दृष्टीने आरोग्य, पाणी, रस्ते आणि स्वच्छता अभियान यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

पालिकेच्या तिजोरीत भर टाकण्याच्या दृष्टीने भाडेवाढ, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील थकीत भाडे वसूल करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.गेल्या दोन वर्षांत नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट होता. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत विशेष मोहीम राबविण्याची वेळ नगरपरिषद प्रशासनावर आली. कोरोना संकटाचा काळ असल्यामुळे शासनाकडून येणारा विकासात्मक निधीही ठप्प झाला होता. हंगामी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक कारभार हाकत आहेत. या कालावधीत घरपट्टी शंभर टक्के वसुली, पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तिजोरी पुन्हा भरू लागली.

महिला कल्याणकारी योजना, प्रसाधनगृहे, ओपन जिम, जिमखाना मैदान खेळपट्टी विकासासाठी १२ लाख, साहित्य चळवळ व ग्रंथालय वृद्धीसाठी एक लाख रुपयांची तरतूद केली आहे. इन्डोअर गेममधील शुल्कवाढ, शिल्पग्राम जमीन भाडे, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे वसुलीकडे विशेष लक्ष देऊन नगरपरिषदेच्या तिजोरीत भर घालण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

घरपट्टी वसुली मोहीम कडक

घनकचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील भूसंपादन प्रस्ताव व मोजणी करून नगरपरिषदेच्या ताब्यातील मालमत्ता यांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. दरम्यान, शंभर टक्‍के घरपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. बऱ्याच प्रॉपर्टी व दुकान गाळे घरपट्टी न भरल्याने सीलबंद करण्याचीही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT