चिपळूण : चिपळूण व खेड(chiplun to khed) तालुक्यातील २७ गावांना कोळकेवाडी धरणाच्या (kolkewadi dam)आऊटलेटमधून ग्रॅव्हीटीने पाणी देणे शक्य असल्याचा निष्कर्ष पुणे येथील मॉर्डन सर्व्हे कन्सल्टंसी या कंपनीने काढला आहे. या कामी विविध विभागांमार्फंत अभ्यास समिती नेमून कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे लेखी उत्तर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil)यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव(mla bhaskar jadhav) यांना दिले.
कोयना धरणातील (koyna dam)पाणी वीजनिर्मितीसाठी वापरल्यानंतर ते वाशिष्ठी नदीत सोडले जाते. हे पाणी परिसरातील कित्येक गावांची तहान भागवू शकते व ही गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होऊ शकतात. या दृिष्टकोनातून आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहेत. गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर २८ फेब्रुवारी २०२० जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी विविध विभागांमार्फत अभ्यास समिती नेमून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. त्यानुसार पुणे येथील मॉडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीची नेमणूक केली होती.
मुंबईत झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार जाधव यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाचा पाठपुरावा केला. त्यावरील लेखी उत्तरात जलसंपदामंत्री पाटील यांनी मॉर्डन सर्व्हे कन्सल्टंसी या कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार २४ ग्रामपंचायतींमधील २७ गावांना ग्रॅव्हीटीने धरणाच्या आऊटलेटमधून पाणी देणे शक्य आहे. या २७ पैकी १५ गावांतील सर्व वाड्यांना, तर १२ गावांतील काही वाड्यांना पाणी देता येऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे. या सर्व गावांची पाहणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग चिपळूण यांनी केली असून, त्याबाबतचा अहवाल २१ मे २०२१ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता यांना सादर केला आहे, असे पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले.
ही आहेत ती २७ गावे
कान्हे, पिंपळी खुर्द, चिंचघरी सती, खेर्डी, कापसाळ, कामथे बु., मिरजोळी, कोंढे, शिरळ, पेढे, वालोपे, कळंबस्ते, खांदाटपाली, पाली, दळवटणे, वालोटी, खडपोली, कालुस्ते, करंजीकर मोहल्ला (ता. चिपळूण) काडवली, काजवेवाडी, नवीन कोळकेवाडी, आंबडस, चिरणी, लोटे, धामणदेवी, भेलसई (ता. खेड)
कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटीने पाणी आणण्याचा प्रयत्न माझ्याआधी अनेकांनी केला. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. आपण सतत पाठपुरावा, पत्रव्यवहार व विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून आवाज उठवून यासाठी शासनाला अभ्यास समिती, सल्लागार समिती नेमण्यास भाग पाडले. त्यांचे निष्कर्ष शासनाला प्राप्त झाले आहेत. आता हा विषय तडीस नेईपर्यंत आपण शांत बसणार नाही, कोळकेवाडी धरणाचे पाणी ग्रॅव्हीटीने मोफत मिळाल्यानंतर ही २७ गावे कायमस्वरूपी सुजलाम सुफलाम होतील.
-भास्कर जाधव, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.