Sports Controversy 2021 esakal
क्रीडा

Flash_Back 2021 : क्रीडा विश्व कोरोनातून सावरले; मात्र 'या' 17 वादांनी गाजले

अनिरुद्ध संकपाळ

सरते 2021 चे वर्ष हे क्रीडा विश्वासाठी महत्वाचे वर्ष ठरले. 2021 मध्ये क्रीडा (sports world) विश्वाने कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातून मार्ग काढत काही महत्वाच्या आणि मोठ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. यात टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics), युरो कप, कोपा अमेरिका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC), टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) यासारख्या मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे.

कोरोनाच्या (Corona) सावटातून बाहेर येत क्रीडा विश्वाने चाहत्यांसाठी काही रंजक सामन्यांची मेजवाणी दिली. मात्र याच वर्षात क्रीडा जगतात अनेक वादही झाले. (Sports Controversy 2021) अशाच सरत्या 2021 मधील क्रीडा विश्वातील 17 वाद आपण पाहणार आहोत.

1 नाओमी ओसाकाचा प्रेस कॉन्फरन्स वाद (Sports Controversy 2021)

टेनिस स्टार चार ग्रँड स्लॅम विनर नाओमी ओसाकाने 26 मे 2021 ला फ्रेंच ओपन खेळताना आपण प्रेस कॉन्फरन्सला हजर राहणार नाही असे ट्विटरवरुन घोषित केले. यावेळी तिने लोकांना खेळाडूची काही कदरच नाही असे मला सारखे वाटते. ज्या वेळी मी पत्रकार परिषदेत हजर राहते त्या त्या वेळी मला खेळाडूच्या मानसिक आरोग्याबाबत कोणाला काही पडलेले नाही असे जाणवते. आयोजक सातत्याने तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करा नाहीतर तुम्हाला दंड केला जाईल असे सांगत असलीत आणि ते म्हणतील खेळाडू हे आमच्या दृष्टीने खेळाडू महत्वाचे आहेत असे म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी नाओमी सारखे इतर खेळाडूही पत्रकार परिषदेत जाण्यास नकार देतील म्हणून तिला दंड केला होता. तरी जर तिने पत्रकार परिषदेला जाणे टाळले तर तिला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी धमकीही आयोजकांनी दिली होती. वाढता दबाव पाहून नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधूनच माघार घेतली.

2 टीम पेनने ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद सोडले (Tim Paine)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. त्याचे जुने 2017 आक्षेपार्ह मेसेजचे ( सेक्सटिंग) प्रकरण पुन्हा वर आल्यानंतर पेनने हा निर्णय घेतला. त्यावेळी त्याने पत्रकार परिषदेत माझे वर्तन हे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला शोभेल असे नव्हते हे मान्य केले.

3 पेंग शुई गायब झाली

चीनची टेनिसपटू पेंग शुई जवळपास 18 दिवस गायब होती. तिने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते झँग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. आरोप केल्यानंतर पेंग शुई गायब झाली होती. त्यामुळे टेनिस विश्वात खळबळ उडाली आणि अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस संस्थांनी तिच्या समर्थनात उतरले होते. फ्रेंच ओपन आणि विंबल्डन दुहेरीची माजी विजेती पेंग शुईने निवृत्त झालेल्या झँग गाओली यांच्यावर तीन वर्षापूर्वी बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पेंग शुईने वौबोवरील आपली ऑनलाईन पोस्ट डिलीट केली होती. या प्रकरणात जागतिक टेनिस असोसिएशन चीनवर सातत्याने दबाव निर्माण करत होते. त्यांनी पेंगच्या सुरक्षेची हमी देण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी चीनमधील सर्व स्पर्धा एक डिसेंबरला स्थगित केल्या होत्या.

4 बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कारांची मालिका

चीनमधील 2022 मध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा यासाठी पाश्चिमात्य देशातील अनेक मानवाधिकार संघटना मागणी करत होत्या. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन प्रशासनाने पहिल्यांदा चीनच्या विंटर ऑलिम्पिकवर बहिष्काराची घोषणा केली. त्यानंतर युरोपियन युनियननेही अशाच प्रकारच्या बहिष्काराची घोषणा केली.

चीनवर शिजियांग प्रांतातील मुस्लीम अल्पसंख्याकांवर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. यावरुन अमेरिका आणि बाकी काही देशांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. याचबरोबर चीनवर तिबेटमध्ये केलेली दमनशाही आणि हाँग काँगमध्येही मानवी अधिकारांची केलेली गळचेपी यावरून जागतिक स्तरातून टीका झाली आहे.

5 मायकेल वॉगनला बीबीसी पॅनलमधून वगळले

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉगन याला बीबीसीने वर्णद्वेश वादानंतर आपल्या तज्ज्ञांच्या पॅनलमधून वगळले. यॉर्कशायर काऊंटी क्रिकेट क्लबमध्ये वर्णद्वेश केला जातो असा आरोप माजी खेळाडू अझीम रफिक याने सप्टेंबर 2020 मध्ये केला होता.

रफिक याने गेल्या वर्षी यॉर्कशायरमध्ये मला बाहेरचा असल्याचे सातत्याने जाणवून दिले जात होते. त्यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे असा खळबळजनक आरोप केला होता. त्याने वर्णद्वेशावर आधारित दुजाभाव आणि छळ झाल्याची अधिकृत तक्रारही दाखल केली होती. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉगन याने 2009 मध्ये आशियाई वंशाच्या खेळाडूंना उद्येशून 'तुमची संख्या फारच वाढली आहे. आम्हाला याबबात काहीतरी करावे लागेल.' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

6 पहिल्या ट्रान्सजेंडर ऑलिम्पिक खेळाडू लॉरेल हुबार्डवरुन वादंग (Sports Controversy 2021)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून लॉरेल हुबार्ड याची नोंद झाली. मात्र या खेळाडूवर आरोपही तेवढेच झाले. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या इतर वेटलिफ्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लॉरेल हुबार्डला अधिक संधी असल्याचा आरोप झाला.

तीन वेटलिफ्टर खेळाडूंनी तर पहिल्या ट्रान्सजेंडर वेटलिफ्टर म्हणून लॉरेल हुबर्डयांच्याबाबत पत्रकार परिषदेत वक्तव्य करण्यास नकार दिला होता.

7 इराणच्या महिला फुटबॉल संघाने खेळवला पुरुष गोलकीपर

इराणवर जॉर्डन विरुद्धच्या सामन्यात महिला फुटबॉल संघात पुरुष गोलकिपर खेळवल्याचा आरोप झाला होता. झोहरेह कौदाई या 32 वर्षाच्या महिला गोलकीपरने पेनाल्टी शूटआऊटमध्ये दोन पेनाल्टी सेव्ह केल्या होत्या. इराणने हा सामना 4 - 2 असा पेनाल्टी शूटाऊटवर जिंकला होता. त्यानंतर इराण पहिल्यांदाच आशियाई महिला फुटबॉल कपसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर जॉर्डनच्या फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रिंस अली बिन अल - हुसैन यांनी ट्विट करुन कौदाईची लिंगतपासणी करण्याची मागणी आशिया फुटबॉल फेडरेशनकडे केली.

8 क्विंटन डिकॉकने गुडघा टेकवण्यास दिला नकार (Quinton de Kock)

टी 20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वर्णद्वेशाचा निषेध करण्यासाठी गुडघे टेकवण्यास नकार दिला. सगळे संघ वर्णद्वेशावर निषेध नोंदवत असताना डिकॉकच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला.

मात्र डिकॉकने नंतर यावर संघसहकाऱ्यांची माफी मागत क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सांगितलेल्या पद्धतीनेच वर्णद्वेशाचा निषेध करण्यास होकार दिला. मात्र या प्रकरणामुळे त्याला आपले कर्णधारपद गमवावे लागेल होते.

9 सिमॉन बिलेसने मानसिक आरोग्याला दिले प्राध्यान्य (Simon Bailes Gymnastics)

अमेरिकेची स्टार जिमनॅस्ट सिमोन बिलेसने टोकियो ऑलिम्पिक सुरु असतानाच सर्व स्पर्धांमधून मानसिक आरोग्याच्या कारणावरुन माघार घेतली. तिने हा निर्णय टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघ फायनलमध्ये पोहचला असताना घेतला. तिने आपण मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचे सांगितले.

10 मोहम्मद शामी विरोधात सोशल मीडियावरून ट्रोलिंग (Sports Controversy 2021)

भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा हरला. त्यानंतर भारतीय संघातील एकमेव मुस्लीम खेळाडू मोहम्मद शामीवर सोशल मीडियावरून ट्रोलिंग सुरु झाले. याचबरोबर सामन्यानंतर भारतात मुस्लीम समुदायाविरुद्ध हिंसाचारही झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

दुबईतील पराभवानंतर मोहम्मद शामीला ऑनलाईन टार्गेट करण्यात आले. शामीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला गद्दार संबोधणारे शेकडो मेसेज आले होते.

11 नीरज चोप्रा - अर्शद नदीम वाद (Neeraj Chopra)

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि त्याचा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीम यांच्या बाबतीत विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. पाकिस्तानचा अर्शदने नीरजचा भाला घेतला यावरून नदीमच्या हेतूबाबत शंका घेणारा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र नीरज चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले होते.

12 मनिका बात्राकडून प्रशिक्षकांवर मॅच फिक्सिंगचे आरोप (Manika Batra)

मनिका बात्राने टोकोयो ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये तिसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली. मात्र मनिका बात्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. मनिकाने आपले वैयक्तीक प्रशिक्षक संनमय परांजपे यांना सामन्यादरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र ही परवानगी नाकारली होती. नंतर मनिका बात्राने राष्ट्रीय प्रशिक्षकांवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता.

13 सुशील कुमारची जेलमध्ये रवानगी (Sushil Kumar)

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी 23 मे रोजी अटक केली. त्याच्यावर कुस्तीपटू सागर धनकरचा अपहरण करुन खून केल्याप्रकरणी अटक झाली आहे. सुशील कुमार या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. याबाबतचे काही पुरावे असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. धनकर आणि त्याच्या दोन मित्रांवर हॉकी स्टीक आणि बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सागर धनकरचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.

14 नीरज चोप्राच्या प्रशिक्षकांची गच्छंती (Neeraj Chopra)

जर्मनीचे दिग्गज भालाफेकपटू हॉन हे नीरज चोप्राला 2017 पासून प्रशिक्षण देत होते. मात्र भारतीय अॅथलॅटिक्स फेडरेशनने त्यांची गच्छंती केली. नीरज चोप्राने ज्यावेळी आशियाई स्पर्धेत आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते त्यावेळी हॉन त्याचे प्रशिक्षक होते. याचबरोबर ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय भालाफेक संघाचे प्रशिक्षक देखील होते.

जूनमध्ये ऑलिम्पिकची तयारी करताना हॉन यांनी स्पोर्ट्स अथोरेटी ऑफ इंडिया (SAI) आणि अ‍ॅथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) बरोबर काम करणे महाकठीण काम असल्याचे वक्तव्य केले होते.

15 विनेश फोगाट निलंबित (Vinesh Phogat)

भारतीय कुस्ती फेडरेशनने भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे तात्कालीन निलंबन केले. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तीचे पालन केले नाही असा ठपका विनेश फोगाटवर ठेवण्यात आला. फेडरेशनने विनेश फोगाटला तीन वेळा नोटिस बजावली होती.

विनेशने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये रहाण्यास नकार दिला होता. याचबरोबर तिने टीमच्या प्रायोजकांचा लोगो असलेले किट घालण्यास नकार दिला होता. विनेशने स्वतःचे वैयक्तीक प्रायोजक नायकीचा लोगो असलेले किट घालणे पसंत केले होते.

16 सानिया - बोपन्ना ऑलिम्पिक पात्रता वाद (Sania Mirza)

टोकियो ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी भारतीय टेनिस वर्तुळात एक मोठा वाद उद्भवला. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने भारतीय टेनिस असोसिएशनवर जोरदार टीका केली होती. त्याने भारतीय टेनिस असोसिएशनने संपूर्ण भारतीयांना पात्रता नावांबद्दल अंधारात ठेवल्याची टीका केली. भारतीय टेनिस असोसिएशनला जागतिक टेनिस फेडरेशनच्या पात्रता नियमांबद्दल संपूर्ण माहिती नसल्याचा आरोप केला.

त्याने 'जागतिक टेनिस फेडरेशन माझी आणि सुमित नांगलची प्रवेशिका कधीच ग्राह्य धरणार नाही. त्यांनी नामांकन भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यावर फक्त दुखापत आणि आजारपणाचा अपवाद वगळता कोणाचीही प्रवेशिका स्विकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय टेनिस असोसिएशनने खेळाडू, सरकार आणि माध्यामांना अजूनही प्रवेशिका दाखल करण्याची संधी असल्याचे सांगत अंधारात ठेवले.' असे ट्विट करत आरोप केला होता.

त्यानंतर सानिया मिर्झानेही रोहन बोपन्ना तिचा मिश्र दुहेरीचा पार्टनर असणार नाही यावरून टीका केली . टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदक मिळवण्याची उत्तम संधी गमावली असे ट्विट केले होते.

17 विराट कोहली सौरभ गांगुली वाद (Virat Kohli - Sourav Ganguly)

वर्षातील भारतीय क्रीडा वर्तुळातील सर्वात मोठा वाद हा वर्ष सरता सरता घडला. हा वाद भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यात झाला. बीसीसीआयने विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचे वृत्त आले होते.

यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यात आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिका असल्याचा खुलासा केला. मात्र याचवेळी त्याने ज्यावेळी टी 20 चे नेतृत्व सोडले त्यावेळी त्याला कोणही तू नेतृत्व सोडू नकोस असे बोलले नाही असे सांगितले. विराट कोहलीचे हे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच सौरभ गांगुलीने केलेल्या वक्तव्याच्या एकदम उलटे होते.

सौरभ गांगुलीने मी विराट कोहलीला वैयक्तीकरित्या टी 20 संघाचे नेतृत्व सोडू नको असे सांगितले होते. असे वक्तव्य बॅक स्टेज विथ बोरिया या युट्यूब चॅनलशी बोलताना केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT