simona halep File Photo
क्रीडा

Wimbledon : गत चॅम्पियन सिमोनची स्पर्धेतून माघार

ऑस्ट्रेलियन अ‍ॅश्ले बार्टी आघाडीच्या मानांकनासह खेळताना दिसणार आहे.

सुशांत जाधव

विम्बल्डन स्पर्धेतील गत विजेती सिमोना हालेप हिने आगामी विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. डाव्या पायाच्या पिंडरीला दुखापत झाल्यामुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागलीये. रोमानियाची 29 वर्षीय हालेप महिलांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वीच जपानची नाओमी ओसाका हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिमोन हालेपला स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले होते.

ऑस्ट्रेलियन अ‍ॅश्ले बार्टी आघाडीच्या मानांकनासह खेळताना दिसणार आहे. सिमोन हालेप हिला इटालियन ओपन स्पर्धेत दुखापत झाली होती. शुक्रवारी तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सिमोनने 2019 च्या विम्बल्डनशिवाय 2018 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. ही दोन दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावे आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये विम्बल्डन स्पर्धा होऊ शकली नव्हती. 2019 मध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत सिमोन हालेपने अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सला 6-2, 6-2 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभवाचा दणका दिला होता. सोमवारपासून विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या ड्रॉपूर्वीच सिमोन हालेपने स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT