75th Independence Day 2022 9 Cricketing Iconic Moment After India Independence  esakal
क्रीडा

75th Independence Day : 75 वर्षातील 9 आयकॉनिक क्रिकेट क्षण

अनिरुद्ध संकपाळ

75th Independence Day : भारताच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहे. भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या 75 वर्षात भारताने अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. क्रिकेटमध्येही देखील भारताने दमदार कामगिरी करत जगतील सर्वोकृष्ट संघापैकी एक संघ निर्माण केले. बीसीसीआय सध्या क्रिकेट जगतातील एक बलाढ्या शक्ती म्हणून ओळखली जीते.

स्वतंत्र भारताच्या या 75 वर्षात क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांनी देशाचा गौरव वाढवण्याचे काम केले. भारतीय क्रिकेटचे असेच 9 आयकॉनिक क्षण (Cricket Iconic Moment) आपण पाहणार आहोत.

1 - भारत जरी 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळत असला तरी भारताने पहिला कसोटी विजय हा 1952 मध्ये मिळवला होता. 20 वर्षात 24 कसोटी सामने खेळल्यानंतर भारताने चेन्नईत इंग्लंडला पराभूत करत हा विजय मिळवला होता.

2 - भारताने इंग्लंडमध्ये 1971 आपला पहिला कसोटी मालिका विजय साजरा केला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 असा विजय मिळवला होता.

3 - भारताने 1983 साली पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने फायनलमध्ये बलाढ्य अशा वेस्ट इंडीजला मात देत इतिहास रचला.

4 - भारताने 1985 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला मात दिली. 1983 ला वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताने दोन वर्षात दुसरी मोठी स्पर्धा जिंकली. या मालिकेचे मालिकावीर रवी शास्त्री होते.

5 - 1998 मध्ये सचिन तेंडुलकरने शारजा कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 143 धावांची तुफानी खेळी केली. ही खेळी डेझर्ट स्टॉर्म या नावानेही ओळखली जाते.

6 - भारतीय क्रिकेट संघासाठी 2003 हे वर्ष चांगले गेले. भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात भारताने अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. इतिहासात या वर्ल्डकपचे एक वेगळे महत्व आहे.

7 - भारताने 2007 मध्ये वनडे वर्ल्डकपमधील ग्रुप स्टेजमध्येच झालेला पराभव मागे टाकत. पहिला टी 20 वर्ल्डकप आपल्या नावावर केला. या वर्ल्डकपमुळे वनडे वर्ल्डकच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम केले.

8 - भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बरोबर 4 वर्षांनी भारताने 2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयी षटकार मारला. तर युवराज सिंग या वर्ल्डकपचा हिरो ठरला. भारतीय संघाने आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचे वर्ल्डकप जिंकून देत त्याची स्वप्नपूर्ती केली.

9 - यानंतर भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये लॉर्ड्स कसोटी जिंकली. यासर्वांवर 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून कळस चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT