IND vs HK Asia Cup 2022 : आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दुबळ्या हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करत सुपर 4 फेरी गाठली. भारताच्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगने 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताला हाँगकाँगचा निम्माच संघ बाद करता आला. विशेष म्हणजे हाँगकाँगच्या संघातील खेळाडू हे व्यावसायिक क्रिकेटपूट नाहीत. त्यांना क्रिकेटपटू म्हणून उदर निर्वाहासाठी पैसे मिळत नाहीत. त्यांना आपल्या पोटाची खळग भरण्यासाठी इतर कामधंदा करावा लागतो. काही जण तर फूड डिलेव्हरीचं काम देखील करतात. अशा परिस्थिती देखील ते आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत आहेत आणि तगड्या संघांसमोर आव्हान देखील उभं करत आहेत. (Aakash Chopra Statement About Hongkong Cricket Players And Financial Condition)
याच विषयावर भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केले. याबाबतची पोस्ट इएसपीएन क्रिकइन्फोने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. या पोस्टमध्ये आकाश चोप्रा म्हणतो की, 'तुम्ही हाँगकाँगच्या खेळाडूंचे झुंजार खेळीसाठी कौतुक केलंच पाहिजे. ते काही व्यावसायिक क्रिकेटपटू नाहीत. या खेळाडूंचं पोट भरण्याइतपत हाँगकाँग क्रिकेटकडे पैसा नाही. ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इतर कामधंदे करतात. तरी देखील ते क्रिकेट खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. खूप छान!'
दरम्यान, हाँगकाँगच्या गोलंदाजांनी सुरूवातीच्या 13 षटकात टिच्चून मारा केला. त्यावेळी भारत मोठे टार्गेट उभारू शकणार नाही असं वाटत होतं. याचबरोबर फलंदाजीत देखील बाबर हयात (41), किंचित शाह (30) आणि झीशान अलीने (17 चेंडूत 26 नाबाद धावा) झुंजार फलंदाजी करत भारताच्या आवेश खान आणि अर्शदीप सिंगचा चांगलाच समाचार घेतला. हाँगकाँगने 20 षटकात 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.