Abhimanyu Easwaran hoping international debut will happen soon  
क्रीडा

Abhimanyu Easwaran : 'मैं हार नहीं मानूंगा...', भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूच्या भावना व्यक्त

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी जाणार आहे याशिवाय...

Kiran Mahanavar

Abhimanyu Easwaran : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी जाणार आहे. याशिवाय भारत अ संघ 2 चार दिवसीय सामनेही खेळणार आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतकडे सोपवण्यात आली आहे, जो कसोटी मालिकेसाठी संघाचा भाग नाही. या दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे संघ जाहीर करण्यात आले आहेत. दोन्ही संघात अभिमन्यू इस्वरनची निवडला झाली आहे. आता त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

मूळचा डेहराडूनचा असलेला अभिमन्यू इस्वरन म्हणाला की, देशासाठी खेळणे हे कोणत्याही खेळाडूचे अंतिम ध्येय असते. लोक मला भारतीय क्रिकेटर म्हणतात पण मी अजून पदार्पण केलेले नाही. आशा आहे की हे लवकरच होईल.

उजव्या हाताच्या दुखापतीमुळे तो विजय हजारे ट्रॉफी खेळू शकला नाही. परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याची प्लेइंग इलेव्हनमधील निवड फिटनेसवर अवलंबून असेल.

तो म्हणाला की, देशासाठी खेळणे हे माझे एकमेव स्वप्न आहे. मी सहजासहजी हार मानणार नाही. आणि यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. यासाठी मी सदैव तत्पर आहे याची खात्री करून घेऊ इच्छितो. मला आशा आहे की मी लवकरच देशासाठी खेळेन.

भारत अ संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा बंगालचा फलंदाज अभिमन्यू इस्वरनला आशा आहे की, तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघासाठी पदार्पण करण्यात यशस्वी होईल. टॉप ऑर्डरचा फलंदाज अभिमन्यूने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 88 सामन्यांमध्ये 6500 हून अधिक धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि 2021 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी स्टँडबाय म्हणून त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

पहिल्या चार दिवसीय सराव सामन्यासाठी भारतीय अ संघ : साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, प्रदोष रंजन पॉल, सरफराज खान, केएस भरत (कर्णधार, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, पुलकित नारंग, सौरभ कुमार, मानव सुथार, प्रसीध कृष्णा, आकाश दीप, विद्वत दे, विद्वत काका .

दुसऱ्या चार दिवसीय सराव सामन्यासाठी भारतीय अ संघ : साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, केएस भरत (कर्णधार, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, मानव सुथार, आकाश दीप, विद्वा, विद्वा, विद्वा, हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT