Abu Dhabi T10 Fixed : अबू धाबी येथील टी 10 ही लीग आयसीसी अँटी करप्शन युनटीच्या रडारवर आली आहे. या लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप होत आहेत. युकेमधील डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीचे अँटी करप्शन युनिट या लीगविरूद्धच्या सहा गंभीर आरोपांची चौकशी करणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधील केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड देखील खेळ होता. याचबरोबर ही लीग भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरून प्रसारित देखील होत होती.
डेली मेलच्या वृत्तात कोणता दावा केलाय?
- डेली मेलने आपल्या वृत्तात आयसीसीकडे अबू धाबी टी 10 लीगविरूद्ध डझनभरापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.
- आयसीसीच्या तपास यंत्रणेला या स्पर्धेत वेगळ्या स्तरावरील बेटिंग सुरू असल्याचा संशय आहे.
- जवळपास 150 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम बुकींनी स्पर्धेत लावल्याची शक्यता आहे. लीगमधील प्रत्येक संघाला बेटिंग कपन्यां स्पॉन्सर करत आहेत.
- आयसीसीकडे संघात देखील संशयास्पद हालचाली सुरू असल्याची तक्रार दाखल झाली आहे.
- फ्रेंचायजींचे मालक गोलंदाज आणि फलंदाजांना आधीच सुचना देत आहेत. स्टार क्रिकेटपटूंना कोणतीही माहिती न देता सामन्यातून वगळण्यात येत आहे. काही फलंदाज तर आश्चर्यकारकरित्या आपली विकेट फेकत आहेत. (Sports Latest News)
या लीगमध्ये भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने देखील सहभाग नोंदवला आहे. 10 षटकांच्या या लीगमध्ये जगभरातील नामवंत क्रिकेटपटू सहभागी होत आहे. त्यातच ही लीग फिक्सिंगच्या वादात सापडल्याने या सर्व खेळाडूही चौकशीच्या भोवऱ्यात अडकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.