साताऱ्याच्या आदितीने मिळविलेले हे यश देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी ठरली आहे, असं कौतुक खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.
नवी दिल्ली : गेल्याच महिन्यात ज्युनिअर गटात जग्गजेती ठरलेली साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी हिने विश्वविक्रम करत शिरपेचात आणखी एक मोठा मानाचा तुरा खोवला. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात ती विश्वविजेती ठरली.
या तिच्या कामगिरीचं खासदार उदयनराजे भोसले यांनी कौतुक करत शाब्बासकी दिलीये. याच गटात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने ब्राँझपदक मिळवून भारताची मक्तेदारी सिद्ध केली. १७ वर्षीय आदितीची ही आणखी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. वैयक्तिक गटात जग्गजेती ठरणारी ती भारताची पहिली महिला तिरंदाज ठरली.
कंपाउंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात आदितीने दोन वेळच्या जागतिक पदक विजेत्या मेक्सिकोच्या अँड्रिया बेकेरा हिचा १४९-१४७ असा पराभव केला. ज्युनिअर आणि सिनिअर विश्वविजेतेपद मिळवणारी ती पहिली तिरंदाजही ठरली.
१६ वे मानांकन असलेल्या अँड्रिया हिने विद्यमान विश्वविजेत्या सारा लोपेझचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव केला असल्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या; परंतु आदितीचा सामना करणे तिला कठीण झाले. सहाव्या मानांकित आदितीने पहिले तीन बाण जवळपास अचूकतेच्या अगदी जवळ मारत ३०-२९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या चार राउंडमधील १२ बाण अचूक लक्ष्यभेद करणारे ठरले.
अंतिम राउंडमध्ये आदितीने ९ गुणांचे एक लक्ष्य साध्य केले तेथेच तिचे सुवर्णपदक निश्चित झाले होते. आदिती, परनीत कौर आणि ज्योती वेन्नम यांनी शुक्रवारी झालेल्या महिलांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. या प्रकारात उपांत्य फेरीत आदितीचा सामना भारताच्या ज्योती हिच्याशी झाला.
सध्या कमालीच्या फॉर्मात असलेल्या आणि अचूक लक्ष्यभेद करत असलेल्या आदितीने हा सामना १४९-१४५ असा जिंकला. आदितीकडून झालेल्या या पराभवातूनही सकारात्मक ऊर्जा घेणाऱ्या ज्योतीने त्यानंतर ब्राँझपदकाच्या लढतीत तुर्कस्तानच्या इपेक तोम्रुर हिच्यावर १५०-१४६ अशी मात केली.
भारताच्या १७ वर्षीय आदिती स्वामी हिनं आज जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविलं. साताऱ्याच्या आदितीने मिळविलेले हे यश देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी ठरली आहे, असं कौतुक खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.
आदितीनं ज्युनियर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आज बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळविलं. अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीनं (१४९-१४७) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. बेकेरा दोन वेळा जगज्जेता राहिली आहे.
भारतीय संघानं नुकतेच पहिल्यांदाच कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या पाठोपाठ आदिती स्वामीच्या यशामुळं देशाच्या पदक तक्त्यास चार चांद लागले आहेत. आदितीचं तसंच तिच्या कुटुंबीयांचं उदयनराजे यांनी अभिनंदन केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.