टोकियो : अफगाणिस्तानची (afghanistan) महिला पॅरा खेळाडू २००४ नंतर पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेण्यासाठी टोकियोत (TOKYO) पोचली आहे. झाकिया खुदादादी आणि हुसेन रसौली या दोन अफगाण खेळाडूंनी उद्घाटन सोहळ्यानंतर तब्बल पाच दिवसांनी अनेक नाट्यमय घडामोडींनंतर जपानची (Japan) राजधानी गाठली.
आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीने (आयपीसी) दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, ‘तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर दोन पॅरालिंपिक खेळाडूंना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.’ या दोघांनाही फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी पॅरिसमधील राष्ट्रीय क्रीडा तज्ज्ञ संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे.
अफगाणिस्तानातील सर्व राजकीय उलथापालथीनंतरही दोघांनी टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. नियमानुसार, झाकिया आणि हुसेन हानेडा विमानतळावर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आयपीसीचे अध्यक्ष अँड्रयू पार्सन्स आणि आयपीसी अॅथलीट्स कौन्सिलचे अध्यक्ष चेल्सी गोटेल यांनी टोकियो पॅरालिंपिक क्रीडानगरीमध्ये त्यांचे स्वागत केले.
आयपीसीचे अध्यक्ष अँड्रयू या वेळी बोलताना म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानचा पॅरालिंपिक संघ टोकियोला येऊ शकणार नाही, हे कळल्यानंतर, प्रत्येक जण अस्वस्थ झाला आणि दोन्ही खेळाडूही यामुळे निराश होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून या खेळाडूंना जपानमध्ये सुरक्षितपणे आणण्यासाठी जागतिक मोहीम हाती घेण्यात आली. हे खेळाडू टोकियो पॅरालिंपिकमध्ये सहभागी होतील, याबद्दल आम्हाला पूर्वीपासूनच विश्वास होता. त्यामुळेच उद्घाटन समारंभामध्ये अफगाणिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.