नवी दिल्ली- अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मानवतावादी कृती दिसून येत असून लोकांकडून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानचा ओपनर बॅट्समन रहमानुल्लाह गुरबाज गरिबांना मदत करताना दिसत आहे.
अहमदाबादमध्ये सकाळी तीन-चारच्या सुमारास तो फूटपाथवर झोपलेल्या गरिबांना पैसे देऊ करत आहे. कोलकात्ता नाईट रायडर्सने Kolkata Knight Riders (KKR) हा व्हिडिओ शेअर केला आहे. रहमानुल्लाह गुरबाज हा आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो. केकेआरच्या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. (Afghanistan opening batter Rahmanullah Gurbaz was spotted helping the needy people on the side of the street in Ahmedabad at 3 am)
केकेआरने केलेल्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय की, "अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरजू व्यक्तींना पैशाची मदत करत आहे. मागील महिन्यात अफगाणिस्तानमध्ये हैरात येथे आलेल्या भूकंपग्रस्तांसाठी पैसा उभारण्यापासून विदेशी भूमीत तुझ्याकडून झालेल्या या उदार कृतीबाबत, तू आम्हाला प्रेरणा देतोस. देव तुझं भलं करो, जानी."
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा व्हिडिओ शेअर करत गुरबाजचे कौतुक केले आहे. अफगाणी क्रिकेटपटू रहमानुल्ला गुरबाझ याने पहाटे तीन वाजता अहमदाबादच्या फुटपाथवर झोपलेल्या गरीबांना पैसे वाटले. फक्त हृदयात प्रेम माणुसकी आपुलकी हवी, असं ते सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली. नऊ पैकी चार सामन्यांमध्ये अफगाणिस्तानने विजय प्राप्त केला. विशेष म्हणजे बलाढ्य इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान संघाचा अफगाणिस्तानने पराभव केला होता. अंतिम फेरीत जाण्याची संधी अफगाणिस्तानच्या हातून थोडक्यात निसटली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानला मायदेशी जावं लागलं. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.