Team India  Esak
क्रीडा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध खेळणार T20 मालिका! संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

अफगाणिस्तान भारताला दौरा करणारी T20 मालिका: टीम इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'या' देशाविरुद्ध खेळणारी मालिका

Kiran Mahanavar

Afghanistan to tour India T20I series : टीम इंडिया 2024 वर्षाची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने करणार आहे. ही मालिका अशा संघाविरुद्ध खेळली जाईल ज्याविरुद्ध भारताने आजपर्यंत कोणतीही टी-20 मालिका खेळलेली नाही.

या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार असून शेवटचा टी-20 सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

पहिल्यांदाच टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध खेळणार T20 मालिका!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, अफगाणिस्तान क्रिकेट संघ जानेवारी 2024 च्या सुरुवातीला टी-20 मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

सध्या अफगाणिस्तान आणि भारताचे संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कप दरम्यान पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. त्याचवेळी, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे.

3 सामन्यांच्या T20I मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-20 - 11 जानेवारी 2024, मोहाली

  • दुसरा टी-20 - 14 जानेवारी 2024, इंदूर

  • तिसरा टी-20- 17 जानेवारी 2024, बेंगळुरू

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 4 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवला असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळले गेले आहेत.

यापैकी भारताने 4 सामने जिंकले असून एक अनिर्णित राहिला. उभय संघांमधील शेवटचा सामना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान खेळला गेला होता. या सामन्यातही टीम इंडियाने बाजी मारली होती. याचाच अर्थ अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला एकदाही हरवलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT