Naseem Shah VIDEO : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 301 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने हे आव्हान 49.5 षटकात 9 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह! (Afghanistan Vs Pakistan)
पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. अफगाणिस्तानचा वेगावान गोलंदाज फारूकीने नॉन स्ट्रायकरवर असलेल्या शादाब खानला रन आऊट केले. शादाब 48 धावांवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ही 9 बाद 290 अशी झाली.
मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने बॅटने कमाल केली. त्याने फारूकीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या हारिस रौऊफने तीन धावा करत स्ट्राईक नसीम शाहकडे दिले.
आता पाकिस्तानला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. मात्र नसीमने षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारत अफगाणिस्तानच्या विजयाचे स्वप्न तोडले.
झाली आशिया कपची आठवण
एका वर्षापूर्वी एशिया कप 2022 मध्ये देखील असंच काहींच झालं होतं. शारजाहमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. गोलंदाजी फारूकीच करत होता. पाकिस्तानचा एक विकेट शिल्लक होती. त्यावेळी नसीम शाहने सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि विजयी घास अफगाणिस्तानच्या तोंडून पळवला.
पाकिस्तानचा मालिका विजय
पाकिस्तानने श्रीलंकेत सुरू असलेल्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन सामने पाकिस्तानने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. पहिला सामना पाकिस्तानने 142 धावांची जिंकला होता. पाकिस्तानचे 201 धावांचे माफक आव्हान पार करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 59 धावात गारद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.