बिजिंग विंटर ऑलिम्पिकमध्ये (Beijing Winter Olympics) स्कीअर (Skier) आयलीन जीयूने (Eileen Gu) पदार्पणातच सुवर्ण कामगिरी केली. तिने women's big air competition मध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्या चाहत्यांना चीनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिना वैबियो (Sina Weibo) क्रॅशच केला. तिच्या गोल्ड मेडलचे सोशल मीडियावरील सेलिब्रेशन इतके जास्त झाले की वैबियोच सर्व्हरच क्रॅश झाला अशी माहिती सीएनएन वृत्तसंस्थेना दिली आहे. (Eileen Gu a American - Chinese Skier won Gold Medal in Winter Olympics)
विशेष म्हणजे 18 वर्षाची आयलीन ही अमेरिकन - चिनी (American - Chinese) आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला असून तिचे वडील अमेरिकन आहेत तर आई चीनची आहे. जागतिक पटलावर अमेरिका आणि चीन यांच्यातील नातं सर्वांनाच माहिती आहे. या दोन्ही देशांमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मात्र तरीही अमेरिकन - चिनी असलेल्या आयलीन सुवर्णपदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदनाचा तुफान वर्षाव झाला.
विंटर ऑलिम्पिकमध्ये (Winter Olympics) सुवर्णपदक जिंकल्यानंतर आयलीनने 'ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. सर्वात आनंदी क्षण, दिवस काहीही म्हणा. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की आता काय घडले.' अशी प्रतिक्रिया दिली. women's big air competition मध्ये ती तिसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर तिने परफेक्ट लँडिंग करत 94.5 गुण मिळवले. तिने एकूण 188.25 गुण मिळवत पदार्पणातच सुवर्ण पदकावर नाव कोरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.