Rohit Sharma ICC 3 Match Series WTC Final : भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीमध्ये हाराकिरी केली. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचून देखील भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) पटकावता आले नाही. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवशी भारताने 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर असल्याने भारताच्या आशा जिवंत होत्या.
मात्र पाचव्या दिवशीच्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अवघ्या 70 धावात भारताचे 7 फलंदाज बाद करून सामना 209 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. भारतला सलग दुसऱ्या दिवशी WTC विजेतेपदानं हुलकावणी दिली.
सामना झाल्यानंतर रोहित शर्माने पत्राकर परिषदेत प्रश्नांच्या बाऊन्सरचा सामना केला. यावेळी त्याने भारतीय गोलंदाजांना पहिल्या डावात आलेले अपयश, फलंदाजींनी केलेली खराब कामगिरी अशी पराभवासाठीचा कारणं सांगितली. याचबरोबर तो आम्ही वर्षभर चांगले कसोटी क्रिकेट खेळण्याचंही सांगायला विसरला नाही.
यादरम्यान, रोहितने आयसीसीबद्दल देखील नाराजीचा सूर लावला. तो म्हणाला की, 'आयसीसी WTC Final कायम इंग्लंडमध्येच का खेळवण्यात येते? WTC Final जूनमध्येच का खेळवायची? ही फायनल फेब्रुवारी, मार्चमध्ये वर्षाभरात कधीही खेळवली जाऊ शकते. जगात कोणत्याही ठिकाणी ही खेळवली जाऊ शकते.'
रोहितने तीन सामन्याची WTC Final असावी अशी कल्पना देखील मांडली. तो म्हणाला की, 'मला तीन कसोटी सामन्यांची WTC Final खेळायला नक्कीच आवडेल. आम्ही खूप इथंपर्यंत पोहचण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. आम्ही चांगली लढत देखील दिली मात्र आम्हाला फक्त 1 सामनाच खेळायला मिळाला. मला पुढच्या WTC Final मध्ये तीन सामन्यांची मालिका खेळायला नक्की आवडेल.'
आयसीसीची पहिली WTC Final ही 2021 मध्ये झाली होती. ही फायनल इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन येथे झाली होती. यात भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. यंदाची फायनल ही इंग्लंडच्या ओव्हलवर झाली आता पुढच्या 2023 ते 25 च्या WTC Cycle ची फायनल देखील इंग्लंडमध्येच होणार आहे. आयसीसीने याबाबतची घोषणा अधीच केली आहे. ही फायनल लॉर्ड्सवर खेळली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.