Ahmedabad Hotel Rates  eSakal
क्रीडा

World Cup Final : एका दिवसाचं भाडं 1 लाख! अहमदाबादमधील हॉटेल्सचे दर भिडले गगनाला; विमान भाडंही 300 पट महाग

Ahmedabad Hotel Rates : आधीच सामन्याची तिकिटं मिळवणं हे मोठं आव्हान आहे. मात्र, कित्येक फॅन्सच्या अडचणी तिकीट मिळूनही संपत नसल्याचं दिसत आहे.

Sudesh

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. रविवार 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारा अंतिम सामना याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी लाखो लोक उत्सुक आहेत. यामुळे अहमदाबाद शहरातील हॉटेल्सचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.

आधीच सामन्याची तिकिटं मिळवणं हे मोठं आव्हान आहे. मात्र, कित्येक फॅन्सच्या अडचणी तिकीट मिळूनही संपत नसल्याचं दिसत आहे. कारण अहमदाबादमधील हॉटेल्सचे दर महाग म्हणण्याच्याही पुढे गेले आहेत. एरवी 500-700 रुपये प्रतिदिन एवढं भाडं असणाऱ्या हॉटेलचे दरही तब्बल 10,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लक्झरी हॉटेलचे दर एका दिवसासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

प्रवासही महागला

अहमदाबादला पोहोचणं देखील क्रिकेट फॅन्ससाठी अवघड झालं आहे. दिल्ली ते अहमदाबाद विमान तिकिटाची किंमत 15,000 रुपये एवढी झाली आहे. तर मुंबईमधून अहमदाबादला जाणाऱ्या कित्येक खासगी बसचे भाडे देखील महागले आहे. अर्थात, यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या लोकांना देखील मोठा फटका बसत आहे. (Sports News)

पहिली वेळ नाही

क्रिकेट मॅचमुळे शहरातील हॉटेल्सचे दर वाढण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावेळी देखील असाच प्रकार पहायला मिळाला होता. त्यातूनच धडा घेत अंतिम सामन्यासाठी कित्येक फॅन्सनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT