मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक आज वानखेडे स्टेडियमवर पार पडली. या निवडणुकीत एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक हे रिंगणात होते.
अजिंक्य नाईक २०१५ पासून एमसीए मध्ये विविध पदांवर काम करत आहेत. त्यांनी आधी मार्केटिंग कमिटीमध्ये, नंतर अपेक्स कौन्सिल सदस्य म्हणून आणि आता सचिव म्हणून काम केले आहे. आता ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.
एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण ३२९ क्लब मतदार आणि ४७ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हे मतदार होते. आज जवळपास ८०% हुन जास्त मतदान झाले. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी २२१ मते मिळवून विजय प्राप्त केला तर संजय नाईक यांनी ११४ मते मिळवली. १०७ मतांनी अजिंक्य नाईक विजयी झाले.
१० जून रोजी अमोल काळे यांच्या अकाली निधनानंतर एमसीएमध्ये अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी आज निवडणूक पार पडली. अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वाखाली एमसीएचे कामकाज अधिकच प्रगतीशील होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या विजयामुळे एमसीएच्या आगामी योजनांमध्ये नवचैतन्य येणार आहे.
अजिंक्य नाईक यांची निवड एमसीएच्या सदस्यांनी एकमताने केली असून, त्यांना त्यांच्या नव्या कार्यकाळात उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एमसीएच्या विकासासाठी आणि मुंबई क्रिकेटच्या उन्नतीसाठी अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ महत्वाचा ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.