Ajinkya Rahane Becoming Father Second Time Wife Radhika Post On Instagram esakal
क्रीडा

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला ऑक्टोबरमध्ये मिळणार 'गुड न्यूज'

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) सध्या भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेला येत्या ऑक्टोबर महिन्यात गुडन्यूज (Father) मिळणार आहे. अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने (Radhika Dhopavkar) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोत राधिका पती अजिंक्य रहाणे आणि मुलीसोबत दिसत आहे. याच फोटोला राधिकाने एक कॅप्शन दिले यावरून रहाणे कुटुंबीयांच्या घरी अजून एकाचे आगमन होणार आहे.

अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळवता आले नव्हते. तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अजिंक्य रहाणे आणि राधिकाचे लग्न 2014 मद्ये झाले होते. त्यानंतर रहाणे कुटुंबीयात 2019 ला मुलीचे आगमन झाले. आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवरून ऑक्टोबर महिन्यात रहाणेंच्या घरात अजून एकाचे आगमन होणार आहे. राधिकाने शेअर केलेल्या फोटाला तिने ऑक्टोबर असे लिहीत लहान बाळाचा इमोजी आणि हार्टचा इमोजी शेअर केला आहे. यावरून रहाणेंचे कुटुंबातील सदस्य आता तीन वरून चार होणार आहेत. या पोस्टवर अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघाने ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. मात्र अजिंक्य रहाणेची कामगिरीत सातत्याने ढेपाळात आहे. रहाणेने भारताकडून आतापर्यंत 82 कसोटी, 90 वनडे आणि 20 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT