Ajit Agarkar BCCI New Chief  esakal
क्रीडा

Ajit Agarkar : कभी कभी लगता है मैं ही भगवान हूँ... अजित आगरकर ठरवणार कोण राहणार कोण जाणार?

अनिरुद्ध संकपाळ

Ajit Agarkar BCCI New Chief Selector : बीसीसीआयला अखेर एक सक्षम आणि टी 20 क्रिकेट खेळलेला निवडसमिती अध्यक्ष मिळाला आहे. बीसीसीआयने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरची भारतीय वरिष्ठ पुरूष संघाचे निवडसमिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

भारतीय संघ अनेक क्रिकेट फॉरमॅटमध्ये संक्रमणाच्या काळाचा सामना करणार आहे. अशा स्थितीत अजित आगरकर निवडसमिती अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे अजित आगरकर अध्यक्षपद भूषवत असलेल्या निवडसमितीवर एक मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे.

आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा संघ निवडणे

बीसीसीआयचे आधीचे निवडसमिती अध्यक्ष चतेन शर्मा यांना स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआय भारतीय निवडसमिती अध्यक्षपदी एक खमक्या व्यक्ती नियुक्त करण्याच्या तयारीत होती. मात्र अनेक दिग्गजांनी उत्सुकताच दाखवली नाही.

अखेर अजित आगरकर पगारात तब्बल 200 टक्के हाईक घेत निवडसमिती अध्यक्षपदी विराजमान झाला. बीसीसीआयने निवडसमिती अध्यक्ष पदाच्या वार्षिक पगारात तब्बल तीनपट वाढ केली. आता अजित आगरकला 1 कोटी नाही तर 3 कोटी रूपये मिळणार आहे. आगरकरने निवडसमिती अध्यक्षाचा पगार तिपटीने वाढवला खरा मात्र त्याच्यावर आता पगाराप्रमाणेच मोठी जबाबदारी असणार आहे.

सर्वात महत्वाचे काम म्हणजे भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी ट्रॉफी जिंकून देणारा संघ निवडणे हे असणार आहे. भारताने गेल्या 10 वर्षात एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.

2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. आता 5 ऑक्टोबर पासून मायदेशात सुरू होणारा वर्ल्डकप जिंकण्याचा टीम इंडियावर दबाव असणार आहे.

कसोटी संघातही मोठे बदल करण्याची जबाबदारी

भारतीय कसोटी संघाने सलग दोनवेळा WTC Final गाठली. मात्र दोन्ही वेळा भारतीय संघाला ती गदा पटकावण्याचा काही मान मिळाला नाही. आता अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीवर 2023 ते 2025 पर्यंतच्या WTC सायकसाठी भारतीय कसोटी संघ तयार करण्याचे आव्हान असणार आहे.

हा संघ तयार करताना संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या सारख्या वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. विशेष म्हणजे रोहितनंतर संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हा देखील मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

टी 20 संघात जुनी खोडं राहणार की जाणार?

भारतीय संघ 2024 ला टी 20 वर्ल्डकपला सामोरा जाणार आहे. वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन हे टी 20 वर्ल्डकपसाठी कंबर कसेल. यावेळी निवडसमितीला भारतीय टी 20 संघाचा पारंपरिक चेहरा बदलण्याचे आव्हान असणार आहे.

भारतीय संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळवायचा की त्यांना नाराळ देऊन नवे गडी नवे राज्य म्हणत संघात युवा खेळाडूंना स्थान द्यायचं हे देखील अजित आगकरच्या निवडसमितीला घ्यावा लागणार आहे.

सध्या टी 20 मालिकेदरम्यान विश्रांती घेणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला नारळ देण्याचा निर्णय झालाच. तर अजित आगरकरच्या निवडसमितीला हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचे कर्णधारपद कायमचे देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागले.

याचबरोबर रोहित या वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार की नाही याबाबत देखील निर्णय घ्यावा लागले. रोहितचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याकडेच वनडे कर्णधारपद द्यायचं की प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमायचं याचाही निर्णय घ्यावा लागेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT