Ajit Agarkar | Team India | BCCI 
क्रीडा

Team India : वर्ल्ड कपसाठी मुंबईच्या अजित आगरकरला BCCI देणार मोठी जबाबदारी?

2023 च्या विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी फक्त तीन महिने बाकी आहेत त्याआधी...

Kiran Mahanavar

Ajit Agarkar Team India : 2023 च्या विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी फक्त तीन महिने बाकी आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व संघ आता त्याच्या तयारीत गुंतले आहेत. टीम इंडियाही या स्पर्धेपूर्वी अनेक सामने खेळणार असून त्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवड करणार आहे. मात्र, बीसीसीआयसमोर संघ निवडीपूर्वी निवडीचा आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे मुख्य निवडकर्ता. याचा शोध सुरू असून या शर्यतीत पुन्हा एकदा अजित आगरकर यांचे नाव पुढे आले आहे.

गेल्या 4 महिन्यांपासून बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमध्ये मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त आहे. चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अन्य कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. ही पाच सदस्यीय निवड समिती केवळ चार निवडकर्त्यांसोबत काम करत आहे. नुकतेच बीसीसीआयने ही जागा भरण्यासाठी अर्ज मागवले होते.

आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव पाचव्या निवडकर्त्यासाठी आघाडीवर असल्याची बातमी येत आहे. समितीच्या या नव्या सदस्याला मुख्य निवडकर्ता बनवले जाईल, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळे अंदाजही लावले जात होते, त्यात स्टार सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नावही चर्चेत होते.

आता पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या एका वृत्तात दावा केला आहे की, मुंबईचा माजी भारतीय वेगवान गोलंदाज आगरकरला ही भूमिका मिळू शकते. या 45 वर्षीय दिग्गज वेगवान गोलंदाजाचे नाव दोन वर्षांपूर्वी या पदासाठी चर्चेत होते, परंतु त्यानंतर चेतन शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी आली. यावेळी त्यांची निवड निश्चित दिसते. तो सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

आगरकरने भारतासाठी 26 कसोटीत 58 विकेट्स घेतल्या, तर 191 वनडेत 288 बळी घेतले. एवढेच नाही तर त्याने 4 टी-20 सामनेही खेळले. 2007 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून असून त्यानंतर 1 जुलै रोजी मुलाखत होणे अपेक्षित आहे. ही मुलाखत तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती घेईल, जी निवडकर्त्यांशिवाय भारतीय संघांसाठी प्रशिक्षकाचीही निवड करते.

त्याआधी CAC शुक्रवार 30 जून रोजी भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या दावेदारांची मुलाखत घेईल. मुंबईचा दिग्गज फलंदाज अमोल मुझुमदार आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे हे या पदासाठी स्पर्धेत आहेत. याशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जॉन लुईस हा देखील दावेदार आहे. लुईस यांनी महिला प्रीमियर लीगमध्ये इंग्लंड महिला संघ आणि यूपी वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

MP Priyanka Chaturvedi : त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे... त्यांना माहितीये ते हरणार आहेत..

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

Sharad Pawar: आमच्या शेतकऱ्याला मिळते ती थकबाकीदाराची पदवी; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Virat Kohli ने केली नव्या टीमची घोषणा, म्हणाला हा माझा नवा अध्याय...

SCROLL FOR NEXT