Ajit Agarkar BCCI Selector : बीसीसीआने निवडसमिती अध्यक्ष पदासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांना निवडसमिती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 17 फेब्रुवारीपासून हे पद रिक्त होते.
गेल्या दोन दिवसांपासून अजित आगरकर हा भारतीय वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमिती अध्यक्षदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र अजित आगरकर किंवा इतर बडा माजी क्रिकेटपटू निवडसमिती अध्यक्षाला मिळणाऱ्या पगाराबाबत फारसे उत्सुक नव्हते.
मात्र आता बीसीसीआय अधिकाऱ्यांनी अजित आगरकरशी संपर्क साधला असून अजित आगरकरला निवडसमिती अध्यक्षाच्या वार्षिक पगारात वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या निवडसमिती अध्यक्षाला वर्षाला 1 कोटी रूपये पगार मिळतो. तर इतर सदस्यांना 90 लाख रूपये मिळतात. अजित आगरकरने निवडसमिती अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. अर्ज करणाऱ्यांच्या यादीत आगरकर हे एकमेव मोठं नाव आहे.
अजित आगरकरने गुरूवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. आगरकरने 2020 मध्ये देखील निवडसमिती सदस्यासाठी अर्ज केला होता. मात्र बीसीसीआयने त्याची निवड केली नव्हती.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने निवडसमिती अध्यक्षपदासाठी मिळणाऱ्या वार्षिक पागात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडूंना कॉमेंट्री आणि जाणकार म्हणून टीव्ही चॅनल्स चांगली रक्कम देतात. त्यामुळे ते तुलनेने कमी रक्कम मिळणाऱ्या निवडसमिती सदस्य पदासाठी फारशी उत्सुकता दाखवत नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.