लंडन : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आता विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला असेल. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच ओपन जिंकून पुरुष गटात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचच्या मार्गात अडथळे असणार आहेत.
येत्या तीन जुलैपासून विम्बल्डन या हिरवळीवरील ग्रँडस्लॅम स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नोवाक जोकोविचसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रशियाच्या आंद्रेय रुबलेव याचे आव्हान असणार आहे.
अव्वल मानांकित स्पेनचा कार्लोस अल्काराझ याला सलामीच्या लढतीत फ्रान्सच्या जेरेमी चार्डी याचा सामना करावा लागणार आहे.
तसेच उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्याला होल्गर रुन याचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. रुन याची पहिली लढत ग्रेटब्रिटनच्या जॉर्ज लॉफहॅगेन याच्याशी होणार आहे.
विम्बल्डनच्या यंदाच्या मोसमात पुरुष गटामध्ये रोमहर्षक लढती होण्याच्या आशा बाळगल्या जात आहेत.
मेदवेदेव - त्सित्सिपासमध्ये रंगणार द्वंद्व
विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये पुरुष गटात एकापेक्षा एक अशा सरस लढती होण्याची आशा आहे. रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत अपेक्षित आहे.
या लढतीसह कॅस्पर रुड - यानिक सिन्नर यांच्यामध्ये रोमहर्षक उपांत्यपूर्व लढत होण्याची चिन्ह आहेत. त्सित्सिपासला सलामीच्या लढतीत २०२०मधील अमेरिकन ओपन विजेता डॉमिनिक थीमचा सामना करावा लागणार आहे.
या लढतीत विजय मिळवल्यास त्सित्सिपासची गाठ अँडी मरेशी पडेल. मरे याने दोन वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. मरेला पहिल्या लढतीत ग्रेटब्रिटनच्याच रायन पेनिस्टोनचा सामना करावा लागणार आहे.
या पहिल्या फेरीतील लढतींवर लक्ष
मॅटीयो बेरेट्टिनी - लोरेंझो सोनेगो
फ्रान्सेस टायफो - यिबिंग वू
स्टेफानोस त्सित्सिपास - डॉमिनिक थीम
अँडी मरे - रायन पेनिस्टोन
डेव्हिड गॉफिन - निक किर्गीओस
स्टॅन वावरिंका - इमिल रुसुवुओरी
सेबॅस्टियन कोर्डा - जिरी वेस्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.