Amit Mishra Irfan Pathan Tweet Controversy esakal
क्रीडा

माझा देश ग्रेट होऊ शकतो, पण....; इरफानच्या ट्विटवर मिश्राचा पलटवार?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात सध्या आयपीएलचा (IPL) फिव्हर चढू लागला आहे. मात्र याच बरोबर देशात जहांगीरपुरी (Jahangirpuri) सारख्या दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना देखील घडत आहे. याचदरम्यान, भारताच्या दोन क्रिकेट खेळाडूंचे ट्विट सध्या चर्चेचा विषय झाला आहे. इराफान पठाणने (Irfan Pathan) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये जहांगीरपुरीमधील घटनेचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र नेटकऱ्यांनी इरफान पठाणचे हे ट्विट जहांगीरपुरीच्या पार्श्वभूमीवरच केल्याचा अंदाज बांधला. दरम्यान, यावर अमित मिश्राने (Amit Mishra) इरफान पठाणचे ट्विट (Tweet) पूर्ण करणारे एक दुसरे ट्विट केले. यावर काही नेटकरी हे अमित मिश्राचे इरफान पठणाला प्रत्युत्तर मानत आहेत.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इराफान पठाणने 22 एप्रिलला एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तो म्हणतो की, 'माझा देश, माझा सुंदर देश ज्याच्याकडे जगातील सर्वात चांगला देश होण्याची क्षमता आहे. मात्र...' इराफान पठाणने आपल्या या ट्विटमध्ये दिल्लीतील जहांगीरपुरामध्ये झालेल्या धार्मिक दंगलीचा कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र नेटकऱ्यांनी पाठणला याच दंगलीकडे उंगलीनिर्देश करायचे असल्याचे मानले.

दरम्यान, भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने इराफान पठाणच्याच ट्विटचा आधार घेत एक ट्विट केले. हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. काही नेटकरी तर अमित मिश्राचे हे इराफान पठाणला प्रत्युत्तर असल्याचे मानत आहेत. अमित मिश्राने ट्विट केले की, 'माझा देश, माझा सुंदर देश ज्याच्याकडे जगातील सर्वात चांगला देश होण्याची क्षमता आहे.... फक्त काही लोकांना कळायला हवे की देश फक्त एकाच पुस्तकाद्वारे चालला पाहिजे. ते म्हणजे भारताचे संविधान.'

अमित मिश्राच्या या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी इरफान पठाणला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमित मिश्राने गुगली टाकत पठाणला क्लीन बोल्ड केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT